पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते पडीत भोसले जेष्ठ समाज सेवक पुरस्काराने सन्मानीत
वागदरी,दि.१९ :
केरूर ता.तुळजापूर येथील आदिवासी पारधी
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पंडित बिट्टू भोसले यांना क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या प्रमुख्य उपस्थितीत पुणे येथे आयोजित कार्यक्रमात "जेष्ठ समाजसेवक" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंडित भोसले हे अणदूर ता.तुळजापूर येथील मुळ रहिवासी असून ते सध्या केरूर या गावी वास्तव्यास आहेत.त्यांचा जन्म एका आदिवासी पारधी समाजातील सामान्य कुंटुबात झाला असून पारधी समाज हा समाजातील मुळ प्रवाहापासून कोसो मैल दुर असल्याने पंडित भोसले शिक्षणापासून वंचित राहीले.वडिला बरोबर बलुते मागत फिरता फिरत त्यांचा संपर्क समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी आला.त्यामुळे त्याना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. दरम्यानच्या काळात मराठवाडयाचे साने गुरुजी म्हणून ओळखले जानारे माजी आमदार शिक्षण महर्षी कै.सि.ना.अलूरे गुरूजी यांच्याशी संपर्क आला. त्यामुळे त्यांच्या विचारात फार मोठे परिवर्तन झाले.मला शिक्षणाची संधी मिळाली नाही हे माझे दुर्देव आहे. परंतु पारधी समाजातील पुढची पिढी शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे, अंधश्रध्देतुन बाहेर पडली पाहीजे या विचाराने प्रेरित त्यानी सन १९७८ पासून सक्रिय झाले.आपल्या मुला मुलीना शाळेत घातले तसेच पारधी समाजातील इतर मुलाना,मुलीना शिक्षणच्या प्रवाहात आणले. आजही त्यांचे ते कार्य अविरतपणे चालू आहे. एवढचं नाहीतर पारधी समाजातील कुटुंबांना हक्काचे घरकूल मिळाले पाहीजे, शालेय विद्यार्थ्याना जातीचे दाखले मिळाले पाहीजे, पारधी कुटूंबाना रेशन कर्ड मिळले पाहिजे, त्यांची नावे मतदार यादीत नोंदवली पाहीजे, पारधी समाजातील तरुणाना रोजगार मिळाला पाहीजे,सुशिक्षित तरुणाना शासकीय नोकरीत सामावून घेतले पाहिजे यासाठी सातत्याने शासनाकडे मोर्चे, आंदोलनाच्या मध्यमातून निवेदन देवून पाठपुरावा करण्याचे काम सातत्याने करत आहेत. त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेवून क्रांतीवीर चाफेकर समितीने पंडीत भोसले यांची जेष्ठ समाजसेवक पुरस्कारासाठी निवड करून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंडित भोसले याना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वत्र त्यांचे आभिनंदन केले जात आहे.