नळदुर्ग येथे अंगणवाडीत पोषण पखवाडा पंधराडा आभियानाचे उदघाटान

वागदरी (एस.के.गायकवाड ):
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प(नागरी ) आधिकारी धाराशिव अंतर्गत नळदुर्ग ता. तुळजापूर येथिल अंगणवाडी क्रमांक १ ते ९ अंगणवाडीच्या वतीने राबविण्यान येणाऱ्या पोषण पखवाडा पंधरवाडा आभियानाचे उदघाटन येथील अंगणवाडी क्रमांक ४ बौद्धनगर व शिवकरवाडी नळदुर्ग येथे सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई रणे यांच्या हस्ते करण्यात आले.
  
एकात्मिक बाल विकास प्रकल्य (नागरी ) आधिकारी धाराशिवच्या वतीने कुपोषित बालकांचे प्रमाण कमी  करण्यासाठी जिल्हाभर अंगणवाडीतील बालकांच्या सकस पोषण अहारा विषयी जाणिव जाग्रती करण्याच्या उद्देशाने पोषण पखवाडाआभियानाअंतर्गत पोषण पखवाडा पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
  त्याचाच भाग म्हणून नागरी प्रकल्प अधिकारी राजेंद्र कड व परिवेक्षिका  अनिता कांबळे यांच्या प्रमुख मार्गर्शना खाली नळदुर्ग येथिल अंगणवाडी क्रमांक १ ते ९ मध्ये दि.८ एप्रिल ते २२ एप्रिल २o२५ दरम्यानच्या काळात पोषण पखवाडा पंधरवाडा साजरा केला जाणार असून दि ८ एप्रिल २०२५ रोजी येथिल अंगणवाडी क्रमांक ४ बौद्ध नगर व शिवकरवाडी नळदुर्ग येथे पोषण पखवाडा आभियानाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार किशोर धुमाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं (आठवले ) जेष्ठ कार्यकर्ते दुर्वास बानसोडे, रिपाइं जिल्हा साचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या अनिता रणे आदी उपस्थित होते.
 
 प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्य हस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महमानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन करून सामाजिक कार्यकर्त्या अनिता रणे यांच्या हस्तें दिप प्रज्वलीत करून पोषण पखवाडा पंधरवाडा चे उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी पोषण ट्रॅकर .मधिल माहीती,CMVM प्रकल्पा अंतर्गत तीव्र कुपोषित बालकांचे सामुहिक व्यवस्थापण,१ ते १ooo दिवसातील बाळाच्या आरोग्या विषयाचे महत्व, हेल्थ लाईफ चाईल्ड या विषयी मार्गदर्शन,अंगणवाडीत व घरी पालकाने बालकाना द्यावयाचा सकस पोषण आहार या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी एस.के. गायकवाड यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. 

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका अशा गायकवाड,ज्योती घोडके, संगीता राठोड, किरण सोनवने, अंजना जाधव आदीनी परिश्नम घेतले. यावेळी अंगणवाडी सेविका सुनिता इंगोले,छाया जाधव,अस्मा बाबासे,तलबिया कार्दी,अकमा बाडेवाले, बिस़्मीला बाडेवाले अशा गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या कविता झेंडारे सह अंगणवाडी कार्यकर्त्या मदत निस उपस्थित होते. शेवटी पोषण आहारा विषयी जाणिव जाग्रती करण्याची प्रतिज्ञा घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन अंगणवाडी सेविका संगीता सुरेश राठोड यानी केले तर अभार  अंगणवाडी सेविका अशा गायकवाड यांनी मानले .
 
Top