सोयाबीन घोटाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची नळदुर्ग येथे शुक्रवारी बैठकीचे आयोजन
अणदूर,दि.०९ : चंद्रकांत हागलगुंडे
नवोदित आडत्याने अणदूर ता.तुळजापूर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन घेऊन जाऊन पेमेंट न केल्याने त्यांची फसवणूक झाली असून हा सोयाबीन घोटाळा जवळपास दोन कोटीच्या आसपास असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्यांनी एकत्रित येऊन नळदुर्ग पोलीसात संबंधित आडत्या विरोधात तक्रार दाखल केली आहे,
त्या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिरात अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे बैठक आयोजित करण्यात आली असून सदरील बैठकीस परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन, पीडित शेतकरी कृती समितीने केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐन खरीप हंगामात या नवोदित अडत्याने आडत दुकान अणदूर मध्ये उघडून सोलापूर, लातूर येथील बाजार भाव पेक्षा जास्त दराने शेकडो शेतकऱ्याकडून सोयाबीन खरेदी केले ,खरेदीच्या 60 टक्के रोख रक्कम तर उर्वरित रक्कम एक महिन्यात मिळेल अशी नामी शक्कल लढवत हजारो पोते सोयाबीन खरेदी केले ,उर्वरित 40 टक्के रकमेसाठी काहींना चेक तर काहींना पावती देऊन त्यांची बोळवण केली. तर काही शेतकऱ्यांना चेक पन नाही अन् पावती पन न देता आठ दिवसात संपूर्ण रक्कम देणार असल्याचे खोटे सांगितले वअणदूर सोडून पलायन केला. कायम संकटात असणारा शेतकरी त्यांच्या भूलथापांना बळी पडला, फसला गेला,आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संघटित होऊन, या आडत्याने केलेल्या फसवणुकी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलीस कोणती भूमिका घेतात. याकडे त्यांचे लक्ष लागले आहे,त्या संदर्भात पुढील दिशा व रणनीती ठरवण्यासाठी सदरील बैठक आयोजित केली असून या सोयाबीन घोटाळ्यात अणदूर,खुदावाडी ,फुलवाडी , धनगरवाडी, नळदुर्ग, लोहगाव, नंदगाव, केशेगाव, सलगरा, वडगाव ,हिप्परगा , व इतर अनेक गावातील गरीब शेतकरी अडकले असून या महत्वपूर्ण बैठकीस बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी कृती समितीने केले आहे.