उबाठा शिवसेना जळकोट तालुकाध्यक्षपदी विकास सोमुसे-पाटील यांची नियुक्ती
अतनूर,दि.०९
येथील रहिवासी विकास गोविंदराव सोमुसे-पाटील यांची जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बालाजीभाऊ रेड्डी यांच्या शिफारशीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जळकोट तालुका अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा अतनूर ता.जळकोट येथील बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी कट्टर समर्थकाचे निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन करून स्वागत व सत्कार करण्यात येत आहे.
त्यांची नियुक्ती जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख, मराठवाडा विभाग प्रमुख, महाराष्ट्राचे प्रमुख, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख, जिल्हा उपप्रमुख तसेच इतर बाळासाहेब ठाकरे कट्टर समर्थक नेतृत्वाच्या शिफारशीने करण्यात आली आहे.