कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या 
डॉ जयश्री घोडके यांना समाजरत्न पुरस्काराने गौरव

नळदुर्ग,दि.१२: डॉ. दिपक जगदाळे 

नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या शिक्षिका डॉ. जयश्री घोडके यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

जयश्री घोडके यांना ल. र. फाउंडेशन लातूरचे अध्यक्ष उमाकांत जाधव यांच्याद्वारे शेळगी ता. निलंगा येथे आयोजित राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी जेष्ट विचारवंत डॉ. नागोराव कुंभार हे होते. तर उदघाटक म्हणून जेष्ट विचारवंत अमर हबीब हे उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगांवकर ,यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य डॉ .सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, पर्यवेक्षक प्रा. मोतीराम पवार यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 
 
Top