धाराशिव येथे आज रविवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने  मोफत वधू-वर-पालक सूचक मेळावा

धाराशिव,दि.१३ :उमाजी गायकवाड 

मराठा समाजातील मुला-मुलींचे लग्न जुळविणे सोपे व्हावे, यासाठी येथील सकल मराठा समाजाच्या व मराठा  समाजातील अनुभवी व यशस्वी आयोजकांच्या वतीने  रविवार दि.13 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत धाराशिव मधील जिजाऊ चौक, बार्शी नाकाजवळील स्वयंवर मंगल कार्यालयात  मोफत मराठा समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा  समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा समाजात विवाह जुळून येणे ही एक मोठी समस्या झाली आहे. सकल मराठा  समाजाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून धाराशिव येथे भव्य  मराठा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

पालकांनी मेळाव्याला येतांना मुला-मुलींचे दोन  प्रतीमध्ये परिचय पत्र व दोन फोटो सोबत आणावे. पुर्नविवाहासाठी सुध्दा सहभागी होता येणार आहे. मेळाव्याला मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.चळवळ गतिमान करण्यासाठी समाज-बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे उद्घघाटन  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आमदार  कैलास  घाडगे-पाटील हे असणार आहेत.

तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुधीर (आण्णा) पाटील‌,विक्रम (भैय्या) पाटील,उमेश राजेनिंबाळकर, चंद्रसेन देशमुख, प्रीतम बागल,तानाजी जाधव (येडशी), बिभीषण मोरे, ॲड.दर्शन कोळगे यांची उपस्थिती राहणार आहे.

तसेच या कार्यक्रमात प्रा. अभिमान हंगरगेकर, विठ्ठलराव जाधव-पाटील (छत्रपती संभाजीनगर), राजू तांबे (माजी गटशिक्षणाधिकारी), अशोक ठोंबळ,प्रा.नवनाथ पवार मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शिवाजी निकम (बीड), अशोक गायकवाड (शिवाजीनगर बीड),विक्रम जोगदंड (बीड), किसन वळेकर (बीड), मिस्टर. जयकिसन वाघ (अहिल्यानगर), पोपटराव सपकाळ पाटील,अनिताताई पाटील  (परभणी), स्वाती देशमुख (पूणे), विश्वनाथ वाकुरे (तेर), दशरथ थोरात (बार्शी), रावसाहेब कोळगे (लातूर),सुनील देशमुख (छत्रपती संभाजीनगर), सुभाष कोलते (छत्रपती संभाजीनगर), सुधीर गावडे (सोलापूर), कृष्णा (भैय्या) रोचकरी (तुळजापूर), उद्योजक गणेश पुजारी (तुळजापूर) यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहेत.

स्वागत समितीसाठी अशोक गायकवाड,अमोल निंबाळकर, अर्जुन जाधव,अशोक ठोंबळ, गोरोबा लोंढे, रमेश साळुंके, महादेव भोसले,ॲड रमेश भोसले, तानाजी बिरंजे, विजयकुमार पवार, अशोक चव्हाण, प्रा.डॉ. टी.एल. बारबोले,सतिश पवार, आण्णासाहेब कदम,रवि निंबाळकर, नवनाथ काळे, कमलाकर मुंडे, लखन मुंडे, मनोज आव्हाड हे काम पाहणार आहेत.

संयोजक म्हणून प्रा.अभिमान हंगरगेकर, विजयकुमार पवार, प्रा.नवनाथ पवार, राजाभाऊ जगताप,उमाजी गायकवाड, मिस्टर. संजय मगर, कैलास तुकाराम पाटील,अशोक चव्हाण,सतिश ढेकणे,महादेव भोसले, दत्तात्रेय भोसले, अर्जुन जाधव, सतिश पवार, कमलाकर मुंडे,लखन मुंडे, अशोक गायकवाड,अमोल निंबाळकर,गोरोबा लोंढे, नवनाथ काळे,तानाजी बिरंजे, रमेश सपाटे,राजू तांबे हे असणार आहेत.

पालकांनी मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी 9307055362/ 9657684648/9421354538/9404313918 या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
Top