तुळजापूर येथे आयोजित आभिवादन सभेस आंबेडकरी आनुयायानी  उपस्थित राहवे : राजाभाऊ ओव्हाळ 

तुळजापूर,दि.१३ : एस. के. गायकवाड  

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आबेडकर याच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून व संविधानाच्या अमृत मोहत्सवी वर्ष सांगता समारोह निमित्ताने दि. १९ एप्रिल २o२५ रोजी सकाळी ठिक ११ वा. तुळजापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात  सामाजिक न्याय  मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रिय अध्यक्ष ना. रामदास आठवले  यांच्या मार्गदर्शनाखाली आभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  रिपब्लिकन कार्यकर्ते व आंबेडकरी आनुयायानी या सभेला मोठ्या सख्येने उपस्थित राहवे असे आवहान रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश जाँइट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यानी  केले.
   
तुळजापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा रिपाइंच्या माध्यमातून अनेक आंदोलने करत पाठपुरावा  केल्याने  पुतळा बसवण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आभिवादन करण्यासाठी  जाहीर आभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून  ना. रामदास आठवले हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. 


या प्रसंगी तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महाराष्ट्र राज्य जाईनट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यांची प्रपुख  उपस्थिती राहणार आहे. या सभेच्या पूर्व तयारीसाठी तुळजापूर येथिल शासकिय विश्रामगृहात  कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकिच्या अध्यक्षस्थानी  मराठवाडा विभाग उपाअध्यक्ष तानाजीं कदम हे तर प्रमुख पाहुणे म्हणून  मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष  आनंद पांडागळे हे होते.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजाभाऊ ओव्हाळ बोलत होते.
 यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे, जिल्ह उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रणजित गायकवाड, जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, जिल्हा युवा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, युवा शहराध्यक्ष अमोल कदम, रोजगार आघाडी तालुका अध्यक्ष अप्पा कदम, नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे,
प्रा. अशोक कांबळे,तालूका संघटक सुरेश लोंढे,  बाळासाहेब सुरवसे, आनंद ढाले, किसन पांडागळे,बापु सोनवणे,रावि वाघमारे, तानाजी उमाजी कदम, वैजनाथ पांडागळे,प्रताप कदम,रनजीत मस्के, अनिल बनसोडे, बाबासाहेब हावळे,शंकर हावळे, तानाजी डावरे,,भास्कर पांडागळे,रमेश गायकवाड, नबाळासाहेब ढवळे,विलास सरवदे, रत्नाकर सरवदे, दाजी माने, सौदागर गायकवाड आदीसह कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top