संकर्षण कराडे यांच्या निवडक कवितांचा समाजशास्त्रीय अभ्यास
संकर्षण कराडे हे एक मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेते आहेत. तसेच ते एक कवी आहेत. ते संघर्षण व्हाया स्पृहा या कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत. ते आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. त्यांच्या कविता मध्ये शोषणविरोध, अन्याय जातीव्यवस्थेचा प्रखर विरोध आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यांची काव्यशैली ही संवादात्मक, सामाजिक जाणवेची प्रगल्भता असलेली, मुक्तछंदातील सहज अभिव्यक्ती व्यक्त करणारी, साध्या पण प्रभावी शब्दांचा वापर केलेली, रूपक आणि कमीत कमी शब्दांत जास्त आशय मांडणारी , अभिव्यक्ती आणि भावनिक ओढ निर्माण करणारी, मानवी भावनाचे अचूक चित्रण, वाचकांच्या हृदयाला भिडणारी, साधी आणि प्रभावी भाषा त्यांच्या कवितेत क्लिष्ट सहज आणि प्रभावी शब्दांची रचना आढळते. त्यांचे लेखन केवळ भावनाप्रधान नसून सामाजिक संदेशही देतात. वाचकांना विचार करायला लावणारी, लहान गोष्टींमध्ये मोठा अर्थ सांगणारी, व्यंग आणि उपरोध यांचा सुरेख वापर असणारी, वास्तवाचे भेदक दर्शन घडवणारा दृष्टिकोन, प्रतिकात्मता, प्रत्यक्ष भाष्य आणि भावनिक आवे यांचा सुरेख मिलाफ आहे. हे आपल्या कवितेतून माझा ला योग्य दिशा देण्याचे कार्य सातत्याने करतात. त्यांच्या पंढरीचा विठुराया, आई सेटल, मोठ व्हायचंय ना ,व्हा हा की इतकी का घाई सौभाग्यवती भव अशा अनेक कविता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
'पंढरीचा विठुराया 'या कवितेत संत परंपरेने समृद्ध असलेल्या वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाने ओथंबून भरलेली ही कविता आहे. कोरोनामुळे अखंड सुरू असलेली वारी खंडित झाली त्यामुळे वारकऱ्यांच्या मनातील हळव्या भावना कवीने अत्यंत हृदयस्पर्शी मांडल्या आहेत. बाबा सातारकर महाराजांसोबतचा संवाद आणि वारकऱ्यांच्या भक्तीचा गहिरा आशय कवितेतून उलगडतो. परंतु ही कविता केवळ पारंपारिक भक्तीपर नाही तर कवीने भक्तीला व्यापक सामाजिक संदर्भ दिला आहे. वारी बंद झाली असली तरी विठ्ठलाचे दर्शन विविध रूपात घडते. डॉक्टर, पोलीस सफाई कर्मचारी आणि सैनिक यांच्या माध्यमातून. या कवितेचा आशय भक्ती आणि समाजसेवा यांचा सुरेख संगम साधतो. ही कविता केवळ वारीच्या बंदी वर नाही तर ती भक्तीच्या स्वरूपावर भाष्य करते. विठ्ठल हा समाजसेवक आहे. हा संदेश स्पष्टपणे पोहोचतो. त्यामुळे कविता आशयघन ठरते. या कवितेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास , वारकरी संप्रदाय हा समाजातील एक महत्त्वाचा भक्ती संप्रदाय असून, तो केवळ अध्यात्मिक जीवनाचा भाग नाही तर, सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. कोरोना काळात वारकऱ्यांची मानसिक अवस्था वार्षिक वारी बंद होणे म्हणजे केवळ यात्रा बंद होणे नव्हे तर त्यांच्या जीवनशैलीला बसलेला धक्का कवीने भक्तीची व्याख्या बदलून ती सेवेपर्यत पर्यंत नेली आहे. विठ्ठलाला केवळ मूर्तीत न पाहता तो समाजातील कष्टकरी आणि सेवेकर्यांमध्येही आहे हे कवितेत प्रभावीपणे दर्शवली आहे. भक्तीचा संसर्ग नेहमी भक्तांच्या मनी राहू दे चंद्रभागेच्या स्नानाची एकच लस असू दे ती म्हणजे ज्ञानोबा तुकारामची ही कविता वारकरी संप्रदायाच्या भक्तीला आधुनिक समाजाच्या वास्तवाशी जोडते आणि वाचकांच्या हृदयात ठसा उमटवते.
'सेटल 'या कवितेत बालपणीचे जीवन हे सहज आणि बंधन युक्त असते. त्या काळात जबाबदाऱ्यांचा भार नसतो. लहानशा गोष्टीमध्ये ही समाधान असते. मित्रांसोबत खेळणे, आई-वडिलांचे प्रेम, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकणे इ. याच्या उलट मोठेपणाच्या माणूस जबाबदारांच्या जाळ्यात अडकतो. समाजाच्या अपेक्षा, आर्थिक स्थैर्याची धडपड, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सगळ्यामुळे तो स्वतःचा आनंद विसरतो कवी असे म्हणतात की मोठेपण म्हणजे एका खेळात अडकणे होय. कवीला त्यांचे बालपण आठवते ते पुन्हा त्या निरागस जगात परत जाण्याची इच्छा व्यक्त करतात. लहानपणी जो पेरूच्या झाडावर चढायचा मित्रांसोबत मस्त खेळायचा, आजी कडून महाभारताच्या कथा ऐकणे, एक क्षण पुन्हा जगू इच्छितात. बालपणीच्या एका साध्या जगाकडे मोठ्यापणाच्या गुंतागुंतीकडे होणारा प्रवास, कवी आपल्या आठवणीतून मांडतात. या कवितेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास , बालपणातील स्वातंत्र्यांनी मोठेपणातील जबाबदार आहे यातील तफावत मांडण्यात आली आहे. तसेच आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती यांमधील संघर्ष दाखवला आहे. समाजाच्या नियमांमध्ये अडकलेला माणूस आणि त्याची भावनिक ओढाताण अधोरेखित केली आहे. ही कविता वाचकाला स्वतःच्या आयुष्यातील बालपण आणि मोठेपण याचा विचार करायला लावते म्हणूनच ती सर्वसामान्य माणसाच्या मनाला स्पर्श करते.
'आई' या कवितेत आई ही आपल्या लेकरांसाठी आयुष्यभर त्याग आणि संघर्ष करणारी एक देवता स्वरूप माया आहे. लहानपणापासून लेकरांना सुख देण्यासाठी झटणारी मोठी झाल्यावर ही आपल्या मुलांसाठी कष्ट करत राहते पण आपण आईसाठी काही करतो का? तिच्या सुखासाठी काही करतो का? असे प्रश्न कवी स्वतःला विचारतात. कवी सांगतात की आई सकाळी सर्वांच्या आधी उठते आणि सर्वजण झोपल्यानंतर झोपते. ती स्वयंपाक करते. प्रेमाने जेवायला वाढते पण स्वतः मात्र उशिरा जेवते. आपण अनेकदा तिच्याकडून काहीतरी मागतो पण तिने आपल्यासाठी काही केले आहे हे लक्षात ठेवतो का? कवी सांगतात, की ती कधीही घरी रिकाम्या हाताने येत नाही, नेहमी लेकरांसाठी काहीतरी आणते पण एवढे करूनही आपल्याला आईचा आवडता रंग तिला काय आवडते हेच ठाऊक नसते. आई आपल्यासाठी देवाकडे सतत प्रार्थना करते आपल्या सुखासाठी देवाकडे अर्जाव करते पण आपण कधी तिच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे का? ती आपल्या वाढदिवसाला मित्र-मैत्रिणींना घरी बोलावते, केक आणते. सगळ्यांना खाऊ घालते पण आपण कधी तिच्या वाढदिवसाला तिच्या वाढदिवसाला तिच्यासाठी काही केले आहे का? आपण पसारा करतो आईने मी आवरते पण तिने केलेल्या पसारा आपण कधी आवरतो का? आपण भांडतो, कधी कधी चुकून आईवरही ओरडतो पण तिच्या मनाला किती दुखावत असतो याचा विचार करतो का? असे प्रश्न कवी वाचकास करतात. या कवितेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास अभ्यास आई ही समाजातील प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. ती फक्त मुलांचीच काळजी घेते असे नाही तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. कविता ही असे अधोरेखित करते की, कुटुंबाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी आईचे प्रयत्न अनमोल असतात पण तिचे योगदान अनेकदा दुर्लक्षित केली जाते. मातृत्व , प्रेम ,कष्ट आणि निस्वार्थ, भावनांचा उत्कृष्ट संगम आहे. कवीने आईच्या असण्याने होणाऱ्या सकारात्मक प्रभावावर भर दिला आहे. ती केवळ एक व्यक्ती नसून वासल्याचा अंश आहे हे कवितेतून प्रभावीपणे मांडले आहे.
मोठ व्हायचंय व्हा ना, इतकी घाई काय ही कविता बालपणातील निरागतेची आठवण करून दे मोठेपणाचा जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकते. बाळाच्या वाढीच्या टप्प्यांचे वर्णन करताना मोठं होण्याची घाई करण्यापेक्षा त्या प्रत्येक प्रतिक्रियेचा आनंद घ्यावा, असे संदेश देतात. बालपणीचे हट्ट, गोंडस बोबडे बोलणे, आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता हीच आयुष्याची खरी गोडी आहे. मोठं झाल्यावर त्या आठवणीच उरतात, म्हणून लहानपणाचा आनंद घेत मोठं व्हावं ,घाई करू नये असा संदेश कवी देतात. या कवितेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास, आधुनिक काळात लोक मोठं होण्याच्या घरी स्वतःलाच विसरतात, या स्पर्धात्मक जीवनशैलीवर कविता भाष्य करते, पूर्वी संयम कष्ट आणि नैतिकता यांना महत्त्व होते आता मात्र झटपट मिळण्याची प्रवृत्ती दिसते. घाईच्या नादात लोक तणाव ,नैराश्य आणि अस्थिरतेला बळी पडतात. मोठं होण्याची घाई प्रत्येक वर्गात वेगळी असते. गरिबांसाठी ती मूलभूत गरजांसाठी असते तर श्रीमंतांसाठी अधिक संपत्ती मिळवण्यासाठी केवळ यशाच्या मागे धावण्याएवजी जीवनाचा आनंद घ्यावा, असा संदेश कविता देते.
सौभाग्यवती भव ही कविता स्त्रियांच्या संपूर्ण आयुष्यावर समाधानी लागलेल्या बंधनाबद्दल आहे. विवाहानंतर स्त्रीला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला जातो परंतु हा आशीर्वाद तिला स्वतंत्रता संकोच स्वातंत्र्याचा करतो का हा प्रश्न कवी उपस्थित करतात. समाजात स्त्रीच्या अस्तित्वाचा फक्त पत्नी आणि सून त्या मर्यादित चौकटीत पाहतो. तिला स्वतःचे विचार आणि निर्णय आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळतो का याचा विचार करायला कविता लावते. तिच्या प्रत्येक हालचालीवर मर्यादा घातली जाते, तिला स्वतःच्या इच्छेनुसार जगता येते का? स्त्रीला पूजलं जातं पण तिच्यावर अन्याय केला जातो. कवीने उपरोधिपणे दाखवले आहे की सौभाग्यवती भव हा आशीर्वाद खरं सौभाग्य देतो का,पण की तो बंधनाचे प्रतीक आहे? या कवितेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास की, महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह, घरगुती जबाबदाऱ्या आणि परंपरांचे पालन करावे लागते, स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्यावर मर्यादित आहेत तर पुरुष मात्र मुक्त असतो, स्त्रीचे आयुष्यातील मोल तिच्या वैवाहिक स्थितीने ठरवले जाते, आधुनिक काळात स्त्रियांना घरकुलाच्या चौकटीत अडकवलं जाते. संकर्षण कराडे यांच्या कवितेतून आपण समाजातील स्त्री जीवनाकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. ही कविता केवळ वाचण्यासाठी नाही तर विचार करण्यासाठी आहे.
लेखिका : कु. श्रुती शिवाजी चौधरी.
धाराशिव