नळदुर्ग : रस्त्याचे अर्धवट कामामुळे नागरिकांची हाल, बालिका जखमी; संतप्त नागरिकांचा पालिकेस समोर बेमुदत उपोषणाचा इशारा 

 नळदुर्ग,दि.२६ :

नळदुर्ग शहरातील रणे प्लॉटींग येथील रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने नागरिकासह लहान मुले रस्त्यावर पडुन जखमी होत असुन तात्काळ रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.
 
 नळदुर्ग शहरातील रणे प्लॉटींग मधील ख्वाजा नगर येथे गेल्या सात वर्षा पुर्वीपासुन रस्त्या अभावी याभागातील नारीकांची प्रचंड हाल होत होती. येथील नागरीक वेळोवेळी घरपट्टी, नळपट्टी भरणा केली आहे. रस्त्याप्रकरणी वारंवार लेखी अर्ज, आंदोलन केल्याने रस्त्याचे काम  

2018 मध्ये करण्यात आला. मात्र इमरान कुरेशी यांच्या घरासमोर 40 ते 50 मिटरचे काम अर्धवट ठेवण्यात आले. त्यामुळे गटराचे व नळाचे पाणी रस्त्यावर येऊन थांबते. पाण्याचे डबके झाल्याने प्रचंड डास होत आहेत. याच रस्त्यावर शाळकरी मुले, वयोवृद्ध महिला, पुरूष पाण्याच्या डबक्यात पडुन अनेकदा जखमी झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसापुर्वी कु.सिद्रा अजिजूर कुरेशी हि शाळकरी मुलगी रस्त्यावर पडुन जखमी झाल्याने तिला गंभीर दुखपत झालेली आहे. 
अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण करावे म्हणुन लेखी व तोंडी अनेकदा सांगुनही न.प.प्रशासनाने याविषयी काहीच कारवाई केलेली नाही. न.प.प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका नाहाकच नारिकांना सहन करावा लागत आहे. या प्रकरणी गांभीर्याने वरीष्ठ् पातळीवरुन लक्ष घालुन नारिकांच्या हितासाठी येत्या आठ दिवसात अर्धवट रस्स्याचे कामपुर्ण करावे, त्याचबरोबर अर्धवट काम ठेवणाऱ्या गुत्तेदार व त्यांना बिल अदा करणाऱ्या न.प. कर्मचारी , अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अन्यथा येत्या दि. ५ मे रोजी सकाळी अकरा वाजता नगरपरिषद कार्यालया समोर नारीकांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.  निवेदनाची प्रत आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

 निवेदनावर कुरेशी अजीज, राहुल माने , वाहेद कुरेशी , सय्यद सिराजोद्दीन, सय्यद मुजोबीन,मुजिब मौजन, सय्यद रेहान ,मुजबिल मौजन,वाहेद नदाफ, सुरेश गवळी, कल्या कोळी,रमेश कोळी, भिमा कोळी, लक्ष्मण कोळी आदीसह इतर नागरिकांच्या सह्या आहेत .                                 
 
Top