डॉ व्यंकटेश मुळे  यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त आम्मा वाचनालयास पुस्तके भेट

नळदुर्ग,दि.२३ :

 शहरातील वैद्यकीय अधिकारी डॉ कै.व्यंकटेश मुळे  यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्ताने आज जागतिक पुस्तकं दिन साजरा करीत मुळे परिवाराच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक .बलभीमराव मुळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने  डॉ.विवेक व्यंकटेशराव मुळे यांच्याकडून "आम्मा वाचनालयास" 51 पुस्तके भेट देण्यात आले.

माजी नगरसेवक व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी सुरु केलेल्या आम्मा वाचनालयस आता हळूहळू नळदुर्गकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.वाचनालयाच्या माध्यमातून लहान मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी सुरु केलेल्या उपक्रमामुळे आज नळदुर्ग शहरातील अनेक लहान मुले वाचन संस्कृतीकडे वळत आहेत. दर रविवारी एक तास वाचन क्लास हा उपक्रम  अहंकारी यांनी सुरु केले असुन त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
 
Top