नळदुर्ग: महामार्गावरील बायपासवर कार व ट्रकच्या अपघातात पाचजण जखमी ; महामार्गाच्या संथगतीचा फटका
नळदुर्ग,दि.०६: नवल नाईक
महामार्गावरील नळदुर्ग शहराबाहेरुन जाणाऱ्या बायपास रस्त्यावर भरधाव कार व ट्रकच्या जोरदार धडक बसुन झालेल्या अपघातात कारमधील पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथील गोलाई ते मुर्टा पाटी मार्गाचे काम मार्चची डेडलाईन संपल्यानंतरही पूर्ण होऊ शकले नसल्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. याचा फटका वाहन चालकांना होत असून शनिवार दि.०५ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता हैदराबादहून श्री क्षेत्र
तुळजापूरकडे निघालेल्या इनोवा टी. एस. १२ इ. एफ. ६८३९ या वाहनाने हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ट्रक क्र. के.ए.५६ ८७०२ या ट्रकला समोरून जोरदार धडक दिल्याने इनोवातील तीन जण किरकोळ तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना नळदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी असलेल्या दोघांना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
जखमींची नावे खालील प्रमाणे. कार चालक महंमद शहबाज महंमद हाजी (वय २५), मंगलबाई सुकनाळे (वय ४६) हे दोघे गंभीर जखमी आहेत. शुभम बिरादार (वय १८), अनुराधा बिरादार (वय ३७)
रामकुमार बिरादार (वय ४३) (सर्व राहणार हैदराबाद) हे किरकोळ जखमी आहेत