ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा; परिसरातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आव्हान- ज्ञानराज चौगुले       
                         
मुरूम, ता. उमरगा, दि.०८

  येथील ग्रामीण रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून डायलिसिस सेंटरचे ऑनलाइन चित्रफितीद्वारे लोकार्पण सोहळा सोमवारी (ता.७)  रोजी संपन्न झाला.  

ग्रामीण रुग्णालयात नव्याने अद्यावत डायलिसिस सेंटरचे फीत कापून उद्घाटन उमरगा-लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे  श्रीकांत मिनियार, बळीमामा सुरवसे, बसवराज वरनाळे, चंद्रशेखर मुदकन्ना, मुख्याधिकारी सचिन भुजबळ, वैद्यकीय अधिकारी सत्यजित डुकरे, अजित चौधरी, भगत माळी, राजेंद्र शिंदे, अमृत वरनाळे, रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनिल राठोड, डॉ. महेश स्वामी, संतोष कांबळे, जगदीश निंबरगे, राजू मुल्ला, राहुल वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी ज्ञानराज चौगुले म्हणाले की, डायलिसिस एक वैद्यकीय प्रक्रिया असून जी मूत्रपिंड कार्यक्षम नसताना रुग्णांच्या शरीरातून अपायकारक द्रव्ये, टाकाऊ उत्पादने व अतिरिक्त पाणी काढून टाकण्याकरिता वापरले जाते. ही अद्यावत यंत्रणा या परिसरातील गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या वतीने मोफत सुरू करण्यात आली आहे. याचा जास्तीत-जास्त परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी त्यांनी केले. श्रीकांत मिनीयार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ही योजना निश्चितच या परिसरातील रुग्णांना फायदेशीर असून अशी योजना सुरू करणे म्हणजे खऱ्या अर्थाने रुग्णांना जीवनदान देणे होय. यामुळे शासन व आरोग्य विभागाचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले. 

डॉ. सिफाना तांबोळी, डायलिसिस तंत्रज्ञ सागर देशमुख, सुकलेश कांबळे, अश्विनी कपुरे, आकाश कवाळे, रवी भालेराव, सचिन तेगाडे, सुजित जाधव आदींनी परिश्रम घेतले. सदर सेंटर स्वतंत्र व अद्यावत वातानुकूलित, स्वतंत्र ४ बेड, टर्मिनल मर्जन्सी, सीपीआर इक्विपमेंट, पेरीटीनियम मशीन, वॉटर प्युरिफिकेशन यंत्रणा, डायलायझर व्यवस्था, बीपी मॉनिटर, ईसीजी मॉनिटर, ऑक्सिजन सॅच्युरेशन, हार्ट रेट,  आरोग्य सेवा कर्मचारी व प्रशिक्षित तंत्रज्ञ, नर्सेस, सॉफ्टवेअर मशीन, मॉनिटरिंग व्यवस्था व औषधोपचार आदींची यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती या विभागाकडून सांगण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश अर्दाले यांनी केले. सूत्रसंचालन विजय भोसले तर डॉ. दिनेश कात्रे आभार यांनी मानले. शहर व परिसरातून विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                   

 फोटो ओळ :  मुरूम, ता. उमरगा येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करताना ज्ञानराज चौगुले, बळीमामा सुरवसे, डॉ. महेश अर्दाले, श्रीकांत मिनियार, बसवराज वरनाळे, चंद्रशेखर मुदकन्ना व अन्य.
 
Top