प्रतिभा निकेतन विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार
मुरूम, ता. उमरगा, ता. २० :
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये भुसणी, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील प्रथम क्रमांक कुमारी सानिया वजीर मुल्ला हिने ८६.६० टक्के, द्वितीय क्रमांक लक्ष्मी राजेंद्र जामगे हिने ८६ टक्के, तृतीय क्रमांक श्रुती तानाजी बनसोडे ८५.२० टक्के घेऊन उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चैतन्यमूर्ती माधवराव पाटील यांची मंगळवारी (ता. २०) रोजी पुण्यतिथीचे औचित्य साधून या मुलींचा फेटा, शाल व पुष्पहार घालून प्रशालेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी शाळेतील सहशिक्षक संजय सपकाळे, प्रेमनाथ आपचे, महिंद्र गायकवाड, मुजावर जमीर, सोनाली काळे, अशोक सुरवसे आदींची उपस्थिती होती.