सांगवी बु येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणची उत्साहात असंख्य भाविकांच्या उपस्थित  सांगता; राम कृष्ण हरीच्या गजराने दुमदूमला परिसर

अक्कलकोट दि. १४:

      अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु गावामध्ये सुरु असलेल्या गृरुवर्य अप्पासाहेब वासकर फड अक्कलकोट विभाग वारकरी संप्रदाय सांगवी बु यांच्या माध्यमातून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली, संपूर्ण सप्ताह चाललेल्या या अखंड हरीनाम सोहळ्यत धार्मिक ग्रंथ, विशेषतः ज्ञानेश्वरीचे पारायण (पठन) केले जाते. या मध्ये सात दिवस नित्य कार्यक्रम म्हणजेच प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम चालतात, सोहळ्याच्या समाप्तीमध्ये धार्मिक विधी, महाआरती, प्रवचन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. 
        
 सप्ताहच्या काळात सर्व भाविक भक्तांना व वाचक याच्यासह सर्वांना सकाळी नाष्टया ची, दुपारचा महाप्रसाद, संध्याकाळचा महाप्रसाद, असे नियोजन आखले जाते. अन्न दाते यांनी आपापल्या सोयी नुसार पंगत वाटून घेतले जातात. या सप्ताह समाप्ती च्या दरम्यान सर्व अन्न दाते,व मंदिरास वस्तू अर्पण केलेल्या भक्तांचे यथोचित सन्मान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती यांच्याकडून करण्यात येतो. सप्ताह दरम्यान सकाळी काकडा, ज्ञानेश्वरी पठण, प्रवचन, कीर्तन, भजन,महा आरती, असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 
        
  या सप्ताह सोहळ्याची सांगता काल्याचे कीर्तन ह भ प बन्सीलाल भोसले महाराज यांच्या कीर्तनाने करण्यात आली. सप्ताह च्या काळात राम कृष्ण हरी च्या गजराने व भक्तीमय वातावरणाने परिसर दुमदूमला होता. या सोहळ्यास गावातील नागरिकांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची उपस्थित होती. 
      
  या अखंड हरीनाम सोहळ्यास ह भ प बन्सीलाल भोसले महाराज, व सप्ताह समिती चे अध्यक्ष अंकुश घाटगे, उपाध्यक्ष राजू भोसले व समितीचे इतर मान्यवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक व श्री शिव छत्रपती तरुण मंडळ सांगवी बु, हनुमान भजनी मंडळ, व सखल ग्रामस्थ यांचे अथक परिश्रम लाभले आहे.
 
Top