अणदूरच्या श्री श्री गुरुकुलाची कु.प्रणौती जत्ते शंभर टक्के घेत केंद्रात प्रथम

सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकाल ; कु.शुभांगी ढाले केंद्रात द्वितीय 


अणदूर , दि . १४ : चंद्रकांत हागलगुंडे 


तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेतील विद्यार्थ्यांनी मागील ७ वर्षाची यशाची परंपरा कायम राखीत याहीवर्षी दहावी शालांत परीक्षेमध्ये शाळेतील ३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.यात कु.जत्ते प्रणौती नागनाथ (१०० टक्के ) गुण मिळवित केंद्रात प्रथम तर कु.ढाले शुभांगी नागेश (९९.४० टक्के) गुण मिळवित केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. 


११ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेले असून यात कु.घोडके वैष्णवी गणेश (९५.२०),सूत्रावे सिद्धी विवेकानंद (९४.६०),ढाले सार्थक सुग्रीव (९४),लकडे आरती अरविंद (९३.६०), कु .जाधव प्राची प्रकाश (९३.२०), कुंभार भाग्यश्री शरणबसवेश्वर (९२.८०),नवगिरे श्रीनिवास गिरीश (९२.),गायकवाड प्रतिक मधुकर (९१.६०), बागडे श्रुती सचिन (९०.४०) आणि १३ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेत तर ९ विद्यार्थ्यांनी ७० पेक्षा अधिक प्राप्त करून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.जितेंद्र  कानडे, सचिव डॉ.नागनाथ कुंभार,संचालिका डॉ.रूपाली  कानडे,मुख्याध्यापक लक्ष्मण नरे, मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना सौ.डॉ रुपाली कानडे,शिवराज भुजबळ, ज्ञानेश्वर बंडगर,भाग्यश्री गोरे,पुष्पा लामतुरे, रामेश्वर सावंत,विशाल महाबोले,अनुजा कुलकर्णी, यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


फोटो ओळी -
अणदूर: शंभर टक्के गुण मिळवलेल्या कु.जत्ते प्रणौती नागनाथ हिचा सत्कार करताना संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे व ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके पाटील सह शिक्षक, पालक.
 
Top