संस्कृती सुरवसे हिचे दहावीच्या परीक्षेत यश
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी कु. संस्कृती संदिप सुरवसे हिने दहावीच्या परीक्षेत ९३. ६० टक्के गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नळदुर्ग शहर नाभिक समाजाचे अध्यक्ष संदिप उद्धवराव सुरवसे यांची संस्कृती ही मुलगी आहे. तिच्या या यशाबद्दल आंबेडकर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष मारुती खारवे , पत्रकार प्रा. डॉ. दिपक जगदाळे, प्रतिष्ठित व्यापारी अजित पंडीत , बाळासाहेब महाबोले, महादेव माने, नेताजी महाबोले, नितीन दळवी, समीर सुरवसे यांच्यासह अनेकांनी तिला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.