भुसणीच्या प्रतिभा निकेतन विद्यालयाने मारली माध्यमिक परीक्षेत शंभर टक्क्याची हॅट्रिक  

मुरूम, ता. उमरगा, ता.१४  :  

भुसणी, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाने  फेब्रुवारी-२०२५ मध्ये माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्के  निकालाची हॅट्रीक केली आहे. यंदाही या विद्यालयाने निकालाची परंपरा राखत या विद्यालयातील १० विद्यार्थी विशेष प्राविण्य, १५ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ४ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

प्रशालेतून  प्रथम येण्याचा मान कुमारी सानिया वजीर मुल्ला (८६. ६०), द्वितीय क्रमांक लक्ष्मी राजेंद्र जामगे (८६) तर तृतीय क्रमांक  बनसोडे श्रुती तानाजी (८५.२०) या यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील,  सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
 
Top