आमदार राणा दादानी कार्यकर्त्यांचे नवस, पायात चप्पल घालून फेडले.. कार्यकर्ते भावनिक

तुळजापूर दि.१७ . चंद्रकांत हगलगुंडे

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील निष्ठावंत तथा मजूर कार्यकर्त्यां नवनाथ मिटकरे यांनी राणादादा आमदार झाल्याशिवाय व मंत्रीपदाची संधी मिळावी म्हणून पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेऊन संकल्प केला होता. याची माहिती समजताच स्वतः आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांचा नवस भाजपाचे युवा कार्यकर्ते प्रवीण घोडके यांच्या घरी स्वतः मिटकरे यांच्या पायात चप्पल घालून पूर्ण केल्याने कार्यकर्ते भावनाविवस होऊन अचंबित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
यावेळी भाजपाचे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड अनिल काळे, धाराशिव जिल्हा सरचिटणीस अँड दीपक  आलूरे, युवा नेते दयानंद मुडके, माजी सभापती बालाजी मोकाशे, राजकुमार गाढवे, अंकुर घोडके, गुंडूशा गोवे, गजानन मोकाशी, महादेव घोडके, नागनाथ घोडके, चंद्रशेखर कंदले, आकाश घोडके आदिसह  कार्यकर्ते उपस्थित होते.

गेली सहा महिन्यापासून मिटकरे हे शेतात उष्णतेच्या दाहकतातही अनवाणीच काम करीत होते. या गोष्टीचे पुसटशी कल्पना समजताच स्वतः राणा दादांनी कार्यकर्त्यांचे मत परिवर्तन करून चप्पल घालण्यास भाग पाडले , कार्यकर्त्यांचा संकल्प व नवस पूर्ण केल्याने उपस्थित कार्यकर्ते मात्र अचंबित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सध्याच्या या  राजकारणात निव्वळ स्वतःसाठी काय मिळते, पदरात काय पाडून घेता येईल या संकल्पनेतूनच कार्यकर्त्यांचा ओघ नेत्याच्या पाठीमागे धावताना दिसते मात्र काही कार्यकर्ते तर असे आहेत ज्यांना दमडीची वा प्रतिष्ठेची तीळ मात्र गरज नसून निव्वळ नेत्यावर व पक्षावर निस्वार्थ निष्ठा आणि प्रेम अपवादात्मकच पहावयास मिळते. कार्यकर्त्यांच्या या निस्वार्थ नवसाचा परिसरात मात्र चर्चा होताना दिसते.
 
Top