तुळजापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा वधू वर मेळाव्याचे आयोजन; नियोजनासाठी संयोजन समितीची बैठक संपन्न
तुळजापूर,दि.०५:उमाजी गायकवाड
नुकताच सकल मराठा समाजाच्या वतीने 13 एप्रिल रोजी धाराशिव शहरात राज्यस्तरीय मराठा वधु वर मेळावा पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक विवाह जुळून आले. त्यापाठोपाठ सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर येथे मंगळवार दि. 25 मे रोजी शहारातील नळदुर्ग रोडवरील गणेश पुजारी यांच्या श्रीनाथ मंगल कार्यालयात मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी शुक्रवार दि.2 में रोजी सायंकाळी 6 वाजता संयोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तुळजापूर तालुक्यात व परिसरात मेळाव्याची माहिती देण्यासाठी पोस्टर बॅनर लावणे, व विवाहेच्छूकांना तसेच पालकांना वधु-वर परिचय मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने येण्यासाठी आवाहन करणे, अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
या मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क नाही. हा मेळावा मंगळवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत श्रीनाथ मंगल कार्यालयात होणार आहे. तरी जास्तीत जास्त वधु वर पालकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक प्रा.अभिमान हंगरगेकर, अशोक गायकवाड, गणेश पुजारी, अमोल निंबाळकर, कृष्णा भैय्या रोचकरी,उमाजी गायकवाड, उत्तमराव (नाना) अमृतराव, सुहास साळुंके, अर्जुन जाधव, प्रा.राजेंद्र घाडगे,अशोक ठोंबळ, ॲड.रमेश भोसले, विश्वास मोटे, अशोक चव्हाण, नागनाथ वाघ, दत्तात्रय तेलंग-कदम, चंद्रशेन देशमुख, हनुमंत भालेकर, अभिजीत जाधव, नवनाथ पवार, रमाकांत लोंढे, बिबीशन मोरे, गोरोबा लोंढे,राजेंद्र कदम, चंद्रकांत भांजी, राजीव तांबे, विजय पवार, अण्णासाहेब कदम, राहुल जाधव या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी येताना वधू- वरांनी सोबत दोन फोटो दोन प्रतीमध्ये बायोडाटा घेऊन पालकांसह मेळाव्यास यायचे आहे. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी
1)अशोक गायकवाड 9307055362
2)प्रा. अभिमान हंगरगेकर 9421354538
3) उमाजी गायकवाड 9923005236
4) अमोल निंबाळकर 9657684648
या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आज काल मुलांना लग्नासाठी लवकर मुली मिळत नाही, त्यांचे लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही.म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची दिवसेंदिवस गरज पडत आहे. हि गरज ओळखून सकल मराठा सोयरीक समाजाच्या वतीने यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले जात आहेत. या या मेळाव्यात विधवा,विदुर, घटस्फोटीत यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. तरी या मोफत मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.