मिटकर यांच्या निवासस्थानी इंदोरीकर महाराजांची सदिच्छा भेट
नळदुर्ग,दि.१२:
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार,ह.भ.प.सुधाकर महाराज इंदोरीकर यांनी मिटकर कुटुंबीयांच्या ‘जानकी’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
श्री.शिवाजीराव मिटकर गुरुजी हे वागदरी व पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहेत.गाथा पारायण,लक्ष्मण शक्ती,कीर्तन, प्रवचन ,दिंडी या माध्यमातून वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा ते तरूणासारखे काम करत आहेत त्यांची भेट घेणे हे मला आपलेपणाचे वाटले असे गौरवोद्गार इंदोरीकर महाराज यांनी काढले.
इंदोरीकर महाराज हे विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत त्यांची पूर्ण राज्यभर अखंड कीर्तन सेवा सुरू असते. अणदूरवरून नागुर येथे कीर्तनाला जात असताना त्यांनी मिटकर कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच तेजाबाई मिटकर,पोलीस प्राधिकरणाचे उमाकांत मिटकर,शिक्षक नेते प्रशांत मिटकर वात्सल्य पतसंस्थेच्या अध्यक्षा राधा मिटकर उपस्थित होत्या.