पारधी समाजातील मुलानी शिक्षण घेवून समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा: सपोनि आनंद कांगुने
नळदुर्ग,दि.१२:
.समाजाच्या मुळ प्रवाहापासून दुर असलेल्या आदिवासी पारधी समाजातील मुला मुलीना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारे पारधी समाजातील जेष्ठ समाजसेवक पंडित भोसले यांचे कार्य कौतुकास्पद असून भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी पारधी कुंदूबाना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवित असून अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी निवासी शाळा सुरू आहेत. तरी अदिवासी पारधी समाजातील मुला मुलीनी उच्च शिक्षण घेवून स्वतःची आणि समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्याचा प्रयत्न करण्याचे नळदुर्ग पोलीस ठाण्याले सहायक पोलीस निरिक्षक आनंद कांगुने यानी आवाहन केले.
पारधी आदिवासी बहुउद्देशिय सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक, पारधी समाजातील जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते केरूर ता. तुळजापूर येथील पंडित बिटू भोसले याना क्रांतीविर चाफेकर समिती पिंपरी चिंचवड पुणे च्या वतीने दिला जाणारा जेष्ठ समाजसेवक पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते मिळाल्या बद्दल पंडित भोसले यांचा सत्कार पंडित भोसले सत्कार समन्वय समिती नळदुर्ग सर्कल व पारधी आदिवासी बहुद्देशिय सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयूक्त विद्यामाने आपलं घर नळदुर्ग येथे दि.१० मे रोजी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सपोनि आनंद कांगुने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी हे होते तर प्रमुख पाहूणे परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, रिपाइं जिल्ह उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,आपल घर चे व्यवस्थापक विलास वकिल ,सहशिक्षक भैरवनाथ कानडे, सपोनि आनंद कांगुने आदी होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीविर बिरशा मुंडा यांच्या प्रतिमांचे पुजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून सपोनि आनंद कांगुने यांच्य हस्ते पंडित भोसले यांचा फेटा, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ,व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार समन्वय समितीचे प्रबोध कांबळे,शाम नागीले,किशोर धुमाळ,उमेश गायकवाड,सिध्दार्थ गायकवाड, पत्रकार आयूब शेख, सतिश राठोड,प्रदिप भोसले,कुंदन भोसले, गणेश भोसले, उमेश भोसले, बबलु भोसले, सुनिता भोसले, मिराबाई भोसले सह कार्यकर्ते उपस्थित हाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ कानडे तर सुत्रसंचलन एस.के. गायकवाड यानी केले. मानपत्राचे वाचन दयानंद काळूंके यानी केले तर अभार अरुण लोखंडे यानी मानले.