तुळजाई स्टोन क्रशरचे थाटात उद्घाटन, चौगुले बंधूंचे कष्ट प्रेरणादायी- रामचंद्र आलूरे
अणदूर ,दि.१२: चंद्रकांत हागलगुंडे
जीवनात कष्टाला पर्याय नाही, कष्टामुळे अनेकांचे जीवन सुखकर झाले असून, चौगुले बंधूंनी केलेल्या कष्टाला आज गोड फळे प्राप्त झाली असून, त्यांची जिद्द, कष्ट याचे अनुकरण आजच्या युवकांनी करून आपले जीवन समृध्द करावे असे आवाहन अणदूर चे सरपंच रामचंद्र आलूरे यांनी केले.ते अणदूर येथील उद्योजक लक्ष्मण चौगुले यांनी उभ्या केलेल्या तुळजाई स्टोन क्रशरच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर श्री तुळजाभवानी साखर कारखाना चेअरमन सुनील चव्हाण, माजी कृषी सभापती दिपक आलूरे, पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, एस. बी. आय. चे प्रवीण कडु, ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, बाळकृष्ण घोडके, यश कन्स्ट्रक्शन चे मधुकर बंदपट्टे, अँड. पांडुरंग शिवलिकर, आयोजक माऊली चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते, टीप्पर ड्रायव्हर ते खडी केंद्राचा मालक अशा कष्टमय जीवनाचा प्रवास केलेल्या लक्ष्मण चौगुले यांनी अणदूर चिवरी रोडवर 25 एकर जमीन घेऊन एस. बी. आय. अणदूर शाखेच्या सहकार्याने 5 कोटी रुपयांचा तूळजाई स्टोन क्रशरचा प्लांट उभा केला असून त्यातून अनेक गरजू तरुणांना रोजगार मिळणार आहे,
यावेळी बांधकाम कामगारांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला, याप्रसंगी भोजनासह, संगीत रजनीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सायंकाळी प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरिकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते,
कार्यक्रमास बालाजी घुगे, दयानंद मुडके, आप्पू धमुरे, प्रशांत मिटकर, आविनाश मोकाशे, बाबू शेख, इमाम शेख, गोविंद शिंदे, जय बजरंग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला, पुरुष, पत्रकार, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर बंदपट्टे, कमलाकर घुगे, डॉ. हरिदास मुंडे, तीप्पना कबाडे, रखमाजी गायकवाड, संतोष नाईक, माणिक निर्मळे, यशवंत मोकाशे, राहुल घोडके, नागेश कुंभार, मुज्जु मकानदार, श्रीनाथ महानोरे व इतर चौगुले मित्रपरिवाराच्या सदस्यांनी पुढाकार घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष पवार यांनी तर आभार लक्ष्मण चौगुले यांनी मानले.