एनसीसीच्या प्रशिक्षणार्थीनी आजपासुनच देश सेवेचे धडे घ्यावेत- माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे आवाहन 

नळदुर्ग, दि.०७ : नवल नाईक 

देश सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगुन एनसीसीमध्ये वाढता मुलीचा सहभाग हि बाब अभिमानाची असुन युवका मध्ये संस्कार, एकता, धर्म निरपेक्षता हि काळाची गरज आहे. आजचा युवका हा भविष्यचा देश रक्षक आहे. म्हणुन एन.सी.सी च्या प्रशिक्षणार्थीनी आज पासुनच देश सेवेचे धडे घ्यावेत असे आवहान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.  
नळदुर्ग येथील कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात येथे 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर आयोजित CATC - 204 कॅम्प 5 ते 14 तारखेपर्यंत दहा दिवसाचा कॅम्प होत आहे. 
या कॅम्पचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाची सुरुवात 22 एप्रिल  रोजी  हल्यातील मृत्युमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरचे कमान अधिकारी तथा कॅम्प कमांडंट कर्नल वाय. बी. सिंग आणि डेप्टी कॅम्प कमांडंट सुभेदार मेजर शंभू सिंग यांनी मधुकरराव चव्हाण शहाबाज काझी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड कार्यालयीन अधीक्षक  धनंजय पाटील पत्रकार प्रा. पांडुरंग पोळे आणि श्रीनिवास भोसले यांचे स्वागत केले. 

कमान अधिकारी कर्नल वाय. बी. सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर मधील यशस्वी झालेल्या कॅडेटचा आदर्श ठेवून आणि एकता व अनुशासन या स्लोगनला अनुसरून कॅडेटने आपले ध्येय साध्य करावे असे प्रतिपादन केले. त्यांनी शिस्त, अन्न व पाण्याचे महत्व, वेळेचे व्यवस्थापन , एकतेची ताकद याविषयी मार्गदर्शन केले. बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव  शहबाज काझी यांनी एनसीसी कॅडेट कॅम्पमधूनच घडत असतो . राष्ट्रहितासाठी एनसीसी कॅडेटची खूप महत्त्वाची भूमिका असते असे सांगितले.

 ज्यावेळेस देशावर संकट येते त्यावेळेस दुय्यम फळी म्हणून एनसीसी कॅडेटची भूमिका महत्त्वाची ठरते असे त्यांनी मत मांडले. प्रास्ताविक कॅम्प सहाय्यक लेफ्टनंट डॉ. अतिश तिडके यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी दहा दिवसांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

. या कार्यक्रमासाठी एक अधिकारी 19 पी.आय. स्टाफ, तर 03 असोसिएट एनसीसी ऑफिसर, एक गर्ल्स कॅडेट इंस्ट्रक्ट् र , 11 सिव्हिल स्टाफ महाविद्यालयातील शिक्षक -कर्मचारी आणि धाराशिव व लातूर जिल्हयातील 438 एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
 
Top