नळदुर्ग: सोमवार  पासून CATC - 204 एनसीसी कॅम्पला बालाघाट महाविद्यालयात  सुरुवात

नळदुर्ग,दि.०५

शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे CATC - 204 एनसीसी कॅम्पला 5 मे पासून सुरुवात होणार आहे. हा कॅम्प 05 ते 14 मे 2025 पर्यंत चालणार आहे. 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांनी या कॅम्पचे आयोजन केले आहे. 

कॅम्प यशस्वी होण्यासाठी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण  यांनी कॅम्पसाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या कॅम्पमध्ये लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 18 कॉलेज आणि 24 हायस्कूल मधील एकूण 450 एनसीसी कॅडेट सहभागी होणार आहेत. यामध्ये सिनियर डिव्हिजन मधील 140 मुले व 90 मुली आणि ज्युनियर डिव्हिजन मधील 118 मुले आणि 102 मुली सहभागी होणार आहे. 23 रँक अधिकारी आणि पाच असोसिएट एनसीसी ऑफिसर सहभागी होणार आहे . यामध्ये 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी औरंगाबादच्या एक लेडी असोसिएट एनसीसी ऑफिसर सहभागी होणार आहे.

53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरचे कमान अधिकारी कर्नल वाय. बी. सिंग आणि सुभेदार मेजर शंभू सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा दहा दिवसीय कॅम्प चालणार आहे. या कॅम्पमध्ये कमांडंट कमान अधिकारी कर्नल वाय. बी. सिंग , डेप्टी कमांडंट  सुभेदार मेजर शंभू सिंग , कॅम्प ॲडज्युडंट लेफ्टनंट अतिश तिडके, ट्रेनिंग जेसीओ नायब सुभेदार बाजीराव पाटील आणि कॅम्प बी. एच. एम. देवेंद्र मेवडा अशा प्रकारचे रँक अधिकारी असणार आहे.

या कॅम्पमध्ये एनसीसी कॅडेटची सकाळ पासून रात्री पर्यंतची दिनचर्या ठरवून दिलेली आहे. कॅम्पमध्ये गार्ड ऑफ हॉनर , हॉलीबॉल, खो - खो , बेस्ट कॅडेट , टग ऑफ वार, सांस्कृतीक इत्यादी स्वरूपाच्या स्पर्धा होणार आहेत. कॅडेट यांना फायरिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यक्तिमत्व विकास, सायबर क्राईम , ए आय तंत्रज्ञान , पोस्को जागृती , युद्धनीती कौशल्य यावर विशेष तज्ञाचे यामध्ये झोनल रिक्रूटींग ऑफीसर , सर्पमित्र , डॉक्टर , पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे.  तसेच ड्रिल , कवायत, फिल्ड क्राफ्ट , बेटल क्राफ्ट आणि विविध खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कॅम्पचे वैशिष्ट्य म्हणजे एनसीसी कॅडेट यांना प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विशेष 10 ट्रेनर ( Ex - NCC cadets and NCCAA member -EXPA) प्रशिक्षित देण्यासाठी येणार आहेत .
हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, कार्यालयीन अधीक्षक  धनंजय पाटील , असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट अतिश तिडके, प्रा. पांडुरंग पोळे, प्रा. दिपक जगदाळे , सुरेश गायकवाड आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट प्रयत्नशिल करीत आहेत .
 
Top