पोलीस दलात भरती झाल्याने मानकोबा कुंभार याचा प्राचार्य डॉ संजय अस्वले यांच्याकडून गौरव
मुरुम,दि.२० :
उमरगा येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि.20 जून रोजी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी कॅडेट मानकोबा कुभांरचा महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्यामुळे त्याचा अभिनंदन करुन सत्कार केला .
तो राजेगाव येथील असुन वडिल शेतकरी अत्यंत गरिब , हालाकिच्या परिस्थितुन मानकोबाला शिक्षण दिले . लहान पणापासुनच अंगी जिद , चिकाटी , खेळाडुवृत्ती असल्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न व अंगावर खाकी वर्दी घालावी ही उमेद उराशी बाळगुण खुप मेहणत घेऊन तो आज चंद्रपुर जिल्हयामध्ये पोलीस विभागात कार्यरत आहे . पदवीचे बीएसी व एनसीसी चे शिक्षण घेण्यासाठी तो उमरगा येथील श्री छ शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला त्याने या संधीचे सोन केल. शाळा ,महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सुद्धा त्याने मैदानी धावणे स्पर्धेत विभागीय, विद्यापीठ, राज्यस्तरीय , स्पर्धेमध्ये यश संपादन केले .
स्वतःच्या स्वबळावर जिद्य , मेहनत, कठोर परिश्रम , अभ्यास आत्मविश्वासाच्या बळावर त्यांने हे यश संपादन केले . त्याबदल प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . कॅडेटसनी मानकोबाचा आदर्श समोर ठेऊन आपल्या महाविद्यालयीन शिक्षणा सोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून वेगवेगळ्या पदावर जाऊन आपले नावलौकिक सिद्ध करून दाखवावे असे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी डॉ विलास इंगळे डॉ.पद्माकर पिटले , प्रा गुंडाबापू मोरे , प्रा शैलेश महामुनी , श्री नितीन कोराळे , राजकुमार सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ गिरीधर सोमवंशी यांनी तर आभार डॉ विनोद देवरकर यांनी मानले. या यशा बदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे , उपाध्यक्ष अश्लेष भैया मोरे यांनी मानकोबास अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाला प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेत्तर कर्मचारी ,एनसीसी कॅडेट व विद्यार्थी उपस्थित होते.