नळदुर्ग शहरात शनिवारी मोफत मधुमेह (शुगर) व रक्तदाब (बीपी) तपासणी शिबीर
नळदुर्ग,दि.२० :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक , माजी गृह राज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार दि. २१ जून रोजी नळदुर्ग शहरातील ओम लॅब,(शशांक शंकरशेट्टी)चावडी चौक येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत ,"मोफत मधुमेह (शुगर) व रक्तदाब (बीपी) तपासणी शिबीर "आयोजित केले आहे.मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख, चिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिरास सुरुवात होईल.तरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.