अँड. सुजित  गायकवाड यांची  नोटरी पदी नियुक्ती 

नळदुर्ग,दि.११:डॉ. दिपक जगदाळे

 तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील रहिवासी अँड. सुजित बापूराव गायकवाड यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अँड. सुजित गायकवाड हे अनेक वर्षापासून  तुळजापूर न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करत असून त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांची काम करण्याची क्षमता पाहूनच भारत सरकारच्या  नोटरी पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.

 त्यांच्या या यशाबद्दल नळदुर्ग येथील युवा उद्योजक समीर मोरे, पत्रकार प्रा. दिपक जगदाळे , माजी नगरसेवक संजय बताले, माजी नगरसेवक शफीभाई शेख, माजी नगरसेवक संजय मोरे, पो.कॉ. बलदेव ठाकूर, महादेव हत्ते यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
Top