ग्रामीण भागातील विद्यार्थीनींसाठी ' अहिल्याबाई होळकर' मोफत एस.टी.पास वितरण


नळदुर्ग. दि. २४ : चंद्रकांत हागलगुंडे 

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थीनींसाठी ' अहिल्याबाई होळकर मोफत एस.टी.पास ' गावापासून ते शाळेपर्यंत दिला जातो.


या शैक्षणिक वर्षापासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार शाळेत जाऊन विद्यार्थी पास देणे बंधनकारक केले आहे सोलापूर - उमरगा या मार्गावरील आष्टामोड,जळकोट,दस्तापूर, जळकोट, आष्टा कासार ,हंगरगा, नळदुर्ग,वसंतनगर ,मानेवाडी, गुजनूर शहापूर बोळेगाव कुंसावळी ईटकळ बाबळगाव निलेगाव, या गावाच्या विद्यार्थी मुली दररोज ये-जा करतात.अशा विद्यार्थी मुलींना ही मोफत पास योजना उपयुक्त ठरते.


 विद्यालयातील  मुली परगावच्या ये-जा करतात. विद्यार्थी मुलींना येत्या काही दिवसात पास वितरण करण्यात येणार आहे.यासाठी विभाग नियंत्रक भालेराव साहेब विभागीय वाहतूक अधिकारी देशमुख साहेब आगार व्यवस्थापक रामचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकाउंटंट  सुधीर बामनकर , वाहतूक निरीक्षक वैभव चेंडके ,वामन आदटराव, नळदुर्ग बसस्थानक प्रमुख  महेश डुकरे हे सुमेश सोमवंशी व अनिल हांडे समवेत नियोजनबध्द पास वितरण करत आहेत.
 
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top