गडकिल्ल्यांची माहितीच्या वह्याचे जि.प. शाळेत वाटप
नळदुर्ग,दि.२७ :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने गडकिल्यांचे कव्हर व माहिती असलेल्या वह्याचे मोफत वाटप दि. 27 जून रोजी नळदुर्ग येथिल जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत करण्यात आले.
हा उपक्रम स्वा.सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांच्या वतीने राबविण्यात आला. जि.प. प्राथमिक शाळेत पहिल्या टप्यातील 200 विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले, यामध्ये छत्रपती शिवरायांच्या रायगड,प्रतापगड,शिवनेरी,तोरणा,राजगड आदीसह अनेक किल्यांची थोडक्यात माहिती,चित्रदर्शन व प्रश्नमंजुषा नमूद केल्या आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वैद्यकीय अधिकारी डॉ.मडके,तलाठी कुलकर्णी ,मनसेचे शहराध्यक्ष अलिम शेख,शिवसेना(ठाकरे)शहर प्रमुख संतोष पुदाले,भाजपा शहराध्यक्ष बसवराज धरणे, पत्रकार विलास येडगे,दिपक जगदाळे,उत्तम बनजगोळे, प्रसन्न कुलकर्णी, मुख्याध्यापक भास्कर मस्के यांच्या हस्ते वह्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या ,सुंदर भालकाटे, वंदना चौधरी,सुरेखा मोरे,बिलाल सौदागर,जयश्री धुमाळ,राहुल खोडके,प्रीती भंडारे यांच्यासह विद्यार्थी,पालक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौदागर बिलाल यांनी तर प्रास्ताविक प्रमोद कुलकर्णी,संतोष पुदाले यांनी केले. आभार खोडके मानले.