येत्या  सोमवारी नळदूर्ग नगरपालिकेच्या आवारात  घंटानाद आंदोलन ; शहरातील महत्वपूर्ण विषयाबाबत लक्ष वेधण्यासाठी आंदोलन

नळदुर्ग,दि.२५ :

नळदुर्ग शहरातील विविध समस्याकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असुन याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या सोमवार दि.३०जुन रोजी न.प. कार्यालयाच्या आवारात घटांनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

बसवसृष्टीचे काम कधी सुरु होणार?,शहरातील हुतात्मा स्मारकांना गतवैभव प्राप्त कधी होणार?,मिरवणूक मार्गाची चाळण झाली आहे,रस्ता कधी होणार?, महिलांसाठी बाजार लाईन येथे स्वच्छतागृह कधी होणार?या प्रमुख मागण्यासाठी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर पालिकेच्या आवारात 30 जून सोमवार रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन बुधवारी न.प. प्रशासनास दिले आहे,

गेल्या अनेक दिवसापासून पालिकेने या महत्वाच्या विषयावर दुर्लक्ष केले असून या सर्व कामांना मुहूर्त कधी आहे असे प्रश्न उपस्थित करुन निवेदन दिले आहे, निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,गणेश बिराजदार आदीच्या स्वाक्षरी आहेत.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top