गुरबसप्पा  करपे यांना संस्कृत विषयात विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान

अणदूर दि.२९ : चंद्रकांत हागलगुंडे                            

तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे सुपुत्र श्री. गुरबसप्पा नीलकंठ करपे यांना संस्कृत विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे. 
         
गुरबसप्पा करपे यांनी " आधुनिक संस्कृत साहित्यात श्री. ह. भी. चिकेरूर यांचे योगदान " या विषयावर विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. या विषयावर भारतात पहिल्यांदाच संशोधन करण्यात आले आहे. तसेच गत दहा वर्षात आधुनिक संस्कृत साहित्यावर पीएच. डी. करणारे गुरबसप्पा करपे हे विद्यापीठाचे तिसरे विद्यार्थी ठरले आहेत. त्यांना मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबईच्या प्रशासकीय अधिकारी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  

त्यांच्या या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संस्कृत विभागप्रमुख प्रा. डॉ. क्रांती व्यवहारे, डॉ. अजय निलंगेकर, प्रा. डॉ. गजानन सानप, प्रा. डॉ. सचिन कंदले, ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. डॉ. जयप्रकाश संगशेट्टी, ज्येष्ठ पत्रकार मकरंद कुलकर्णी, प्रा. डॉ. अश्विन रांजानिकर, प्रा. डॉ. सुरेश मुंडे, प्रा. नामदेव कराड , जय मल्हार पत्रकार संघ, खडकाली ग्रुप,8 फार्मा ग्रुप, सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच नागनाथ कुंभार, दीपक दादा आलूरे, दयानंद मुडके मित्रपरिवारांनी अभिनंदन केले आहे.
 
Top