नळदुर्ग : आमदार लोणीकर यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढुन जोडे मारो आंदोलन

नळदुर्ग,दि.२८ :

येथिल महामार्गावरील  संविधान चौकात  शिवसेना (ठाकरे गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी मोर्चा काढून प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.

बेताल व आपमानजनक वक्तव्य करणाऱ्या आमदाराचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी भूमिका दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. मोर्चाला माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख जितेंद्र कानडे, कृष्णात मोरे,मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले,जगन्नाथ गवळी,युवासेनेचे उपसंघटक दिपक बंडगर,सोशल मीडिया प्रमुख चेतन बंडगर,आमेर शेख आदींनी संबोधित करत बबनराव लोणीकराचा समाचार घेतला.

यावेळी शिवसेनेचे बाळकृष्ण घोडके,सरदारसिंग ठाकूर, शाम माळी,मनसेचे शहराध्यक्ष अलिम शेख,गणेश बिराजदार,शिरीष डुकरे,सोमेश्वर आलूरे,अमोल रुपनुर, किरण बिराजदार,प्रशांत गरड,राम माने, मेजर राजेंद्र जाधव,बबन जोशी,दत्ता भोसले,शाम कणकधर,नेताजी महाबोले,सोमनाथ म्हेत्रे,दिनेश बंडगर,छोटू घुगे,चंदर सगरे यांच्यासह शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक व शेतकरी-नागरिक  उपस्थित होते.याप्रसंगी शेतकरी संघर्ष समितीनेही वक्तव्याचा निषेध करत आंदोलनात सहभागी झाले होते.
 
Top