जगद्गुरुंच्या हस्ते आदर्श सरपंच रामचंद्र आलूरे यांना
आशीर्वाद पदवी प्रदान

अणदूर. दि.२८: चंद्रकांत हागलगुंडे 

 तुळजापूर तालुक्यातील अणदूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच रामचंद्र आलूरे यांना केदार पिठाचे आशीर्वाद पदवी श्री श्री श्री 1008 भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


तालुक्यातील तीर्थ खुर्द येथे गुरुवारी केदार पिठाचे दिवंगत जगद्गुरु श्री सिद्ध लिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस अभिषेक रुद्र पूजा व महाप्रसाद विविध धार्मिक कार्यक्रमाने पार पडला. यावेळी जगद्गुरु श्री श्री श्री 1008 भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मसभा पार पडली.

यावेळी आदर्श सरपंच रामचंद्र आलूरे यांना सामाजिक व धार्मिक कार्यातील विशेष योगदान व निरपेक्ष भावनेने काम करीत असल्याबद्दल त्यांना आशीर्वाद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आ. प्रवीण स्वामी, आप्पासाहेब पाटील, गुरुनाथ बडूरे, गुलचंद व्यवहारे, गोविंदराव माकने, डॉ.अजिंक्य पाटील, आनंद कंदले, अमरराजे कदम, महेश चोपदार, बाबा घोगते, अभिषेक कोरे, सोमनाथ शेटे, गोविंद खुरुद, सह विविध क्षेत्रातील मान्यवर व मठाचे शिवाचार्य उपस्थित होते.
आलूरे यांना मानाची पदवी मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
Top