जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
शुक्रवार दि.०६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून नळदुर्ग येथील जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तद्यात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक संजय बताले यांनी केले आहे.
नळदुर्ग येथील श्री. मल्लिकार्जुन मंदिरात या प्रतिष्ठानच्या वतीने प्रति वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दि. ६ जून रोजी सकाळी दहा ते चार दरम्यान मल्लिकार्जुन मंदिर,चावडी चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.