नळदुर्ग नगरपालिकेत प्रशासकीय कालावधीत अनेक गैरप्रकार ;  सामाजिक कार्यकर्ते सुधीर यांची कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव 

नळदुर्ग,दि.०३ :

नळदुर्ग नगरपालिकेत प्रशासकीय कालावधीत अनेक गैरप्रकार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोतदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करुन याप्रकरणी विशेष बाब म्हणुन चौकशी करुन दोषी विरुध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 सुधीर पोतदार यांनी निवेदनात नमुद केले आहे की,
नळदुर्ग नगरपालिकेचे सतत तीन वर्षापासुन विशेष लेखापरीक्षण झाले नसुन ते तात्काळ करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पोतदार यांनी करुन  नगरपालिकेचे सन २०२२ ते २०२४ या कालावधीत लेखा परिक्षण करण्यात आले नसल्याचे सांगितले आहे.. यामुळे नगरपालिकेत मोठया प्रमाणात गैरप्रकार होत आहे. शहरातील घन कचरा निर्मुलन, स्वच्छता साफ सफाई, शुध्द पाणीपुरवठा याबाबत नगरपालिकेने केलेल्या खर्चात मोठा गैरप्रकार झाल्याचे सांगुन शहरात कोटयावधी रूपये खर्चाची विकासकामे करण्यात आल्याचे म्हटले आहे.

विविध योजनेतुन नगरपालिकेला आलेला निधी इतरत्र खर्च करण्यात आला आहे. दलित वस्ती सुधारणा पाणीपुरवठा योजना, अमृत २.०,९३ कोटी रूपये खर्चाची नगरोत्थान योजना मधुन मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. या योजनामधुन करण्यात आलेल्या कामाच्या टेंडरचीही चौकशी होणे गरजेचे आहे. सतत तीन वर्षे नगरपालिकेचे लेखापरिक्षण करण्यात आले नाही. मात्र अचानक एकदाच दोन वर्षाचे लेखापरिक्षण का करण्यात आले ?  यामध्ये कोणत्या त्रुटी निघाल्या व त्यावर काय कारवाई करण्यात आली याचा तपास करण्याकरीता नगरपालिकेचे सन २०२२ ते २०२४ या प्रशासकिय काळातील विशेष लेखा परिक्षण करण्याचे आदेश देण्यात यावे. त्याचबरोबर शहरातील अपुर्ण कामाची चौकशी करून त्यावरही त्वरीत करवाई करावी शासनाच्या पैशाचा मोठया प्रमाणात दुरपयोग झाल्याचा संशय असुन नगरपालिकेचे विशेष लेख परिक्षण केल्यास तो जनते समोर येईल. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी विशेष लेखपरिक्षण करण्याचे आदेश देण्याची मागणी सुधीर पोतदार यांनी निवेदनात केले आहे.  या निवेदनाची प्रत नगरविकास मंत्री, महसुल मंत्री ,विभागीय आयुक्त् यांना पाठविले आहे.

 
Top