जळकोट येथे ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत जनता दरबार संपन्न ; 420 तक्रारींची नोंद, अनेक समस्यांचे झाले त्वरित निरसन

जळकोट,दि.२९ :

तुळजापूर तालुक्यातील जळकोट  येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या यशस्वी वाटचाली प्रित्यर्थ ‘संकल्प ते सिद्धी’ अभियान अंतर्गत जिल्हा फेडरेशनचे चेअरमन सतीश दंडनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुका अध्यक्षा रंजना विलास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जळकोट येथे रविवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.

या जनता दरबारात पीक विमा, घरकुल, निराधार निवृत्ती वेतन, श्रावण बाळ योजना, शेतकरी अनुदान, शेतरस्ते अशा 420 विविध तक्रारी व समस्यांची नोंद झाली. यातील काही समस्यांचे निरसन तात्काळ करण्यात आले.

कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के यांच्या पुढाकाराने मोफत ५० हून अधिक निराधार व श्रावण बाळ योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास धाराशिव जिल्हा सरचिटणीस अँड दीपक आलुरे, जिल्हा चिटणीस साहेबराव घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, तांडा सुधार योजनेचे जिल्हा आशासकीय सदस्य विलास राठोड, तम्मनप्पा माळगे, इराणा सोन्ने, अरुण लोखंडे, संजय मोटे, अतुल भोसले, प्रवीण चौघुले, नागनाथ किलजे, वसंत पवार, कस्तुराबाई कारभारी, अदिती कुलकर्णी आदी उपस्थित  होते.

या जनता दरबारास जळकोट जिल्हा परिषद गटातील गावांतील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावून आपले प्रश्न मांडले. जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या तक्रारींना निवारण मिळाले असून, उर्वरित प्रकरणे संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
 
Top