नगरपालिकेच्या आवारात मनसे-शिवसेनेचे एकत्र घंटानाद आंदोलन
नळदुर्ग,दि.३० :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने दि. 30 जून सोमवार रोजी नगरपालिकेच्या आवारात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शहरातील प्रमुख मागण्यासाठी घंटानाद करण्यात आले.
नळदुर्ग शहरातील बसव सृष्टीचे काम सुरु कधी होणार?शहरातील हुतात्मा स्मारकांना गतवैभव प्राप्त कधी होणार?शहरातील मिरवणूक मार्गाची चाळण झाली आहे,रस्ता कधी होणार?महिलांसाठी बाजार लाईन येथे स्वच्छतागृह कधी होणार?आदी विषयावर पालिकेला जाग आणण्याकरिता मनसे-शिवसेना(ठाकरे)एकत्र येऊन निदर्शने दाखवत घंटानाद आंदोलन करून निवेदन दिले.
यावेळी माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले,मनसे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,विभाग अध्यक्ष गणेश बिराजदार,शिवसेनेचे शाम कणकधर,रोहन पाटील,सोमनाथ म्हेत्रे,नेताजी महाबोले, मनसेचे शिरीष डुकरे,योगेश मुदगडे,सोमेश्वर आलूरे, संदीप वैद्य रुपेश आलूरे आदिजन उपस्थित होते.