नळदुर्ग येथे ४ ते १० जुलै कालावधीत भागवत सप्ताहाचे आयोजन
नळदुर्ग,दि.०१
प्रतिवर्षाप्रमाणे नळदुर्ग शहरात गेल्या 52 वर्षांपासून सुरु असलेल्या भागवत सप्ताहाची परंपरा यावर्षीही संपन्न होणार आहे. नळदुर्ग येथील आदर्श निवृत्त शिक्षक वसंतराव अहंकारी गुरुजी यांच्या निवासस्थानी दि. 4 जुलै ते 10 जुलै या दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अहंकारी परिवाराकडून मागील 52 वर्षांपासून हा भागवत सप्ताह अखंडपणे सुरु आहे. या सात दिवसात वे.शा.सं.श्रीराम जोशी महाराज ( केज ) यांच्या अमृतवाणीने भागवत कथा सांगितली जाते. दि.4 जुलै पासून सुरु होणाऱ्या या सप्ताह मध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात. दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी, 8 जुलैला गोवर्धन काला, 9 जुलैला श्रीकृष्ण - सुदामा भेट सुदाम्याचे पोहे तर 10 जुलैला गुरुपौर्णिमाला समाप्ती असते. यावेळी पाद्यपूजा केली जाते. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते.
तरी या भागवत सप्ताहा निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन
श्री.बाबुराव - सौ.जयश्री बाबुराव अहंकारी.श्री. वसंतराव - सौ.वनमाला वसंतराव अहंकारी..श्री. बळवंत - सौ.माधुरी बळवंत अहंकारी..श्री. अनंत - सौ.संध्या अनंत अहंकारी..श्री. विकास - सौ.अश्वीनी विकास अहंकारी..श्री. वैभव - सौ.वर्षा वैभव अहंकारी.श्री.योगेश - सौ. अदिती योगेश अहंकारी, श्री. सुनिल पाटील यांच्यासह अहंकारी परिवाराकडून करण्यात आले आहे.