नळदुर्ग शहरात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
नळदुर्ग,दि.०१:
हरित क्रांतीचे प्रणेते , माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती नळदुर्ग येथे विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली .
नळदुर्ग येथील वसंतराव नाईक गोलाई चौकात नियोजित वसंतराव नाईक स्मारकाच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. .प्रारंभी जि. प. माजी अध्यक्ष अँड धीरज पाटील, भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील आदीसह इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.तर ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी मल्हार पाटील यांनी वसंतराव नाईक स्मारकाचे बांधकाम चालू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच वसंतनगर येथे जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जि प सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केले . याप्रसंगी युवा नेते मल्हार पाटील यांनी देखील रक्तदान शिबिरास भेटी दिली . यावेळी भाजपचे अँड दिपक आलूरे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के , दत्ता राजमाने , तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य विलास राठोड, प्रविण पवार, रवी महाराज राठोड, हरीष जाधव , वैभव जाधव, कैलास चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण , वसंत पवार, शिवाजी चव्हाण , मोतीराम राठोड, एम पी राठोड , महेश चव्हाण, जयंती कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, सचिव दत्ता राठोड, कार्याध्यक्ष सुरेश राठोड, कोषाध्यक्ष सचिन राठोड, मिरवणूक प्रमुख सुशील राठोड, माजी नगरसेविका छमाबाई राठोड, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे ,माजी पंच.स.सदस्य साहेबराव घुगे , पद्माकर घोडके , श्रमिक पोतदार , किशोर धुमाळ , पाडूरंग पुदाले , रिपाईचे एस के गायकवाड आदीसह बंजारा समाज बांधव उपस्थित होते .