आई-वडिलांनंतर सर्वात महत्त्वाचे स्थान डॉक्टरांचे - सहप्रांतपाल प्रदिप मुंडे              
डॉक्टर्स डे निमित्त रोटरी क्लब मुरूम सिटी तर्फे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्सचा सन्मान

मुरूम, ता. उमरगा, दि.०२

: समाजातील व्यक्तींच्या जीवनात डॉक्टरांचे महत्त्व कोरोना काळात आपल्या सर्वांना माहितच आहे. खऱ्या अर्थाने रुग्णांना जीवनदान देण्याचे काम, आरोग्य सेवा आणि समर्पण ही सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली. त्यामुळेच आई-वडिलांनंतर सर्वात महत्त्वाचे स्थान हे समाजात डॉक्टरांचे असल्याचे प्रतिपादन धाराशिव येथील सहप्रांतपाल रोटे. प्रदिप मुंडे यांनी केले. डॉक्टर्स डे चे औचित्य साधून रोटरी क्लब मुरूम सिटी कडून आयोजित मुरूम येथील जिरोळे हॉस्पिटलच्या सभागृहात कृतज्ञता सोहळा मंगळवारी (ता. १) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे नूतन अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी धाराशिव येथील सहप्रांतपाल रोटे. प्रदिप मुंडे, नूतन सचिव कल्लापा पाटील, रोटरीचे माजी अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनिल राठोड, विश्वस्त रोटरी सेवा ट्रस्टचे सनिल गर्जे, इंद्रजीत आखाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरातील वैद्यकीय सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ डॉ. राधाकिशन डागा व डॉ. शिवप्रसाद काबरा यांचा मानपत्र, भेटवस्तू, शाल व पुष्पहार घालून सहाय्यक प्रांतपाल रोटे. प्रदिप मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉक्टरांच्या मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. राजकुमार वाकडे यांनी केले. यावेळी डॉ. दत्तात्रय जिरोळे, डॉ. विजयानंद बिराजदार, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश स्वामी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. महेश जिरोळे, डॉ. शिवराज हळळे, डॉ. गंगासागरे, डॉ. जयेश पल्लेवाड, डॉ. सागर काबरा, डॉ. राहुल चिलोबा, डॉ. प्रिती चिलोबा, डॉ. शिल्पा डागा, डॉ. वर्षा बिराजदार, डॉ. सुनिल टिकांबरे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. गिरीश मिनीयार, डॉ. बळवंत चव्हाण, डॉ. शिल्पा जिरोळे आदींसह महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे नूतन संचालक शिवशरण वरनाळे व बाबासाहेब पाटील यांचाही भेटवस्तू, शाल व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राधाकिशन डागा, शिवप्रसाद काबरा, डॉ. नितीन डागा आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी म्हणाले की, रोटरी ही केवळ संस्था नाही तर ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी चळवळ असून रोटरीच्या कार्याची प्रशंसा केली. रोटरियन गोविंद पाटील, कलय्या स्वामी, मल्लिकार्जुन बदोले, भूषण पाताळे, पार्थ डागा आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल राठोड यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार कल्लापा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला रोटरीचे सर्व सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.                                                                  
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील जिरोळे हॉस्पिटलच्या सभागृहात डॉक्टर्स डे निमित्ताने ज्येष्ठ डॉक्टर राधाकिशन डागा यांचा सत्कार करताना प्रदिप मुंडे, आप्पासाहेब सूर्यवंशी, कमलाकर मोटे, कलाप्पा पाटील, सुनिल राठोड, नितीन डागा, शिल्पा डागा
 
Top