नळदुर्ग: संत निरंकारी मंडळाच्या वतीने जागतिक योग दिन साजरा
नळदुर्ग, दि.२१ :
नळदुर्ग येथे शनिवार दि.21जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार रोहित विभुते यांच्या निवासस्थानी संत निरंकारी मंडळ (रजि दिल्ली ) झोन सोलापूर , ब्रंच नळदुर्ग यांच्या वतीने योगासन,प्राणायाम व ध्यान घेऊन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
योग दिनाची सुरुवात सकाळी सात वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक लक्ष्मण नरे यांनी योगासने, प्राणायाम ध्यान यांची माहिती देवून व ओमकार उच्चार करून करण्यात आली. शारीरिक, मानसिक व भावनिक संकटाचा सामना करण्यासाठी योगासन,ध्यान आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून ऑक्सिजन दिलेला आहे. त्याची किंमत आपल्याला वाटत नाही. योग्य वेळी श्वासाच्या माध्यमातून ऑक्सिजन शरीरात साठवून रोगप्रतिकारक शक्ती वाढविल्यास आपण येणाऱ्या संकटाशी सामना करू शकतो. म्हणून योगासने व प्राणायामचे नियमित धडे घेऊन आपण शरीर आणि मन सदृढ करूया अशी अपेक्षा व्यक्त केली.या योगासन, प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून शरीरात उर्जा संचारली. थोड्या वेळासाठी मानसिक शांती व शारीरिक समाधान लाभल्याचे निदर्शनास आले. दररोज अर्धा तास आपण यासाठी वेळ दिला तर निश्चितच आपण अनेक आजारावर मात करू शकतो याची अशी माहिती योग प्रशिक्षक लक्ष्मण नरे यांनी दिली.
यावेळी हळू हळू चालण्यापासून ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, पद्मासन, कटिचक्रासन, पर्वतासन, योगमुद्रा, अर्धमत्छेद्रासन, वज्रासन, मण्डुकासन, शिशुआसन, शलभासन, भुजंगासन, धनुरासन, नौकासन, पवनमुक्तासन, सर्वांगासन, हलासन, सेतूबंधासन, मयुरासन, शीर्षासन, अनुलोम-विलोम, भ्रामरी, भस्रिका, सूर्यनमस्कार, प्राणायाम व शेवटी ओमकार उच्चार घेण्यात आला व शेवट करण्यात आला.
यावेळी संत निरंकारी मिशनचे नळदुर्ग ब्रांच प्रमुख सुनील पिस्के, ज्ञानेश्वर काळे लक्ष्मण विभुते,पवन चव्हाण,अनिल पिस्के शशिकला पिस्के रुक्मिणी घोडके,विजया विभुते, शांता चव्हाण ,सुनीता इंगोले, किरण मोहिते, मंगल गायकवाड, बापु झेंडारे ,कविता झेंडरे ,विजया बिलवरकर, आशा जाधव, शिवगंगा सिधमले ,पल्लवी कर्पे, रामलिंग कर्पे यांच्यासह युवक, नागरिकांना,माता भगिनी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी योग प्रशिक्षक लक्ष्मण नरे यांचा संत निरंकारी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुनील पिस्के यांनी सर्वांचे आभार मानले.