रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार ;
आमदार प्रविण स्वामी यांची ग्वाही
मुरूम,दि.०९:
मुरूम ता.उमरगा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला आमदार प्रवीण स्वामी यांनी सदिच्छा भेट देऊन रुग्णांच्या सेवा आणि रुग्णालयातील सुविधा व समस्यांबद्दल माहिती जाणून घेतली आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
उमरगा लोहाराचे आमदार प्रविण स्वामी हे एका खाजगी कार्यक्रमाच्यानिमित्ताने मुरूम येथे आले असता येथील शासकीय ग्रामिण रुग्णालयाला भेट दिली यावेळी रुग्णालयातील रुग्ण सेवा तसेच उपलब्ध सुविधा आणि समस्याबाबत माहिती घेतले याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ एम.एम.अर्दाळे यांनी रुग्णालयीन कामकाजाबद्दल आणि उपलब्ध सुविधाबद्दल माहिती देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी व रिक्त असलेले पदे भरण्यात यावी अशी विनंती केले यानंतर आमदार स्वामी यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरला भेट देऊन डायलिसिसवरील रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधला.तसेच रुग्णालयाला आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी यासाठी वरिष्ठ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी नगरसेवक अजित चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ जयेश पल्लवाड,सचिन तेगाडे, सुजित जाधव,रत्नदीप घोसले, विजय भोसले,आकाश चव्हाण, सुलकेश कांबळे,सुमित मिसाळ, अधिपरिचरिका शीतल सुरवसे,सुजाता मठपती,राजश्री जाधव,पूजा जाधव,रवी लोहार,श्रावणी वाघे,ममता साबणे,संदीप बाभळसुरे ,लखन भोसले,आकाश चव्हाण,सुलकेश कांबळे, सुमित मिसाळ, बालाजी घोडके,लालुबाई राठोड, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.