अखेरची घटका मोजणा-या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल; रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
नळदुर्ग,दि. १० :
तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावास कंदुरमळा मार्गे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचे काम दहा वर्षांपुर्वी झाले असुन सध्या हा रस्ता अखेरची घटका मोजत आहे. हा रस्ता अंत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहे.
नळदुर्ग हे प्रमुख बाजार पेठ असून ग्रामस्थांना , विद्यार्थ्यांना ये जा करताना नाहकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याकरिता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी रवी पाटील , अमोल जाधव , राजेंद्र सास्तुरे , लखन चव्हाण , गुंडू राठोड , दिलीप चव्हाण , प्रवीण कांबळे , सुरेश लोंढेसह ग्रामस्थांनी केली आहे.