भारतीय जनता पार्टी नळदुर्ग शहर मंडळ कार्यकारणीची निवड जाहीर 

नळदुर्ग ,दि.१७ :

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, धाराशिव जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या तुळजापूर विधानसभा अतर्गंत नळदुर्ग शहर मंडळ कार्यकारणीची निवड  नळदुर्ग शहर मंडळ अध्यक्ष बसवराज धरणे यांनी   अधिकृत  पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. निवड झालेल्या नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.


संघटनात्मक कार्याला बळ देण्याच्या दृष्टीने उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष आदी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नळदुर्ग शहर उपाध्यक्षपदी सहा जणांची निवड करण्यात आली असुन माजी नगरसेवक किशोर ब्रम्हाचारी बनसोडे,, माजी नगरसेविका छमाबाई धनराज राठोड, गणेश दिलीप मोरडे, संदिप दिलीप गायकवाड, गौस जिंदावली शेख, रियासत लियाकतअली शेख आदींची उपाध्यक्षपदी तर सरचिटणीस उमेश मोहन नाईक, सुनिल (बबन) सुरेश चौधरी,विनायक (बंडू ) रमेश पुदाले, यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर चिटणीस. म्हणून सागर जीवनसिंग हजारे, विशाल किशोर डुकरे ,कैलास सुभाष चव्हाण , माधुरी पद्माकर घोडके ,विजया प्रकाश नवगिरे, इस्माईल इसाक शेख, माजी नगराध्यक्षा मुन्वर सुल्ताना निसार कुरेशी तर कोषाध्यक्ष म्हणुन संजय विठ्ठल जाधव यांची  निवड जाहीर करण्यात आली आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top