नळदुर्ग: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली शहरातील विविध विकास कामांची पाहणी
नळदुर्ग,दि.१५ :
नळदुर्ग शहरातील सुरु असलेल्या विविध विकास कामाना रविवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देवुन पाहणी केली. पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर मार्गी लावुन शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
नळदुर्ग शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम, नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम , पाण्याच्या टाकीचे बांधकाम, माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे काम, शादीखाना, तसेच भिमनगर येथिल कामांची पाहणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी करुन संबंधितानासदरील कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
आमदार राणाजगजितसिंह पाटील हे नळदुर्ग शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असून पुढील काळात विकासकामामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून हे काम लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सौर ऊर्जेवर शहरातील पाणीपुरवठा सुरू करणार आहेत. त्यामुळे यामुळे अल्प खर्चात पाणीपुरवठा होऊ शकतो.
यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सुशांत भूमकर, अँड दीपक आलूरे, विलास राठोड,शहर भाजपचे अध्यक्ष बसवराज धरणे, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे ,माजी नगरसेवक नय्यर जहागीरदार, निरंजन राठोड,, छमाबाई राठोड, किशोर बनसोडे,भाजयुमोचे श्रमिक पोतदार ,पद्माकर घोडके, सुधीर हजारे, विनायक अहंकारी , बबन चौधरी, , संजय जाधव, , बंडू पुदाले, पांडू पुदाले,, अनिल पाटील, मुद्दसर शेख, अक्षय भोई, , वैभव पाटील, संदीप गायकवाड, सलीम बागवान, कल्पना गायकवाड, अजय दासकर, साहेबराव घुगे, दयानंद मुडके, गजानन मोकाशे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार आदी उपस्थित होते.