जिल्हा चिटणीस तथा माजी सरपंच सिद्धेश्वर कोरे यांची भाजप राज्य परिषदेच्या सदस्यपदी निवड; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार 

नळदुर्ग,दि.१४:

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथिल रहिवासी भाजपचे जिल्हा चिटणीस तथा माजी सरपंच 
सिद्धेश्वर कोरे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  सत्कार करून  पुढील  वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सिध्देश्वर कोरे यांच्या निवडीबद्दल  तांडा सुधार समितीचे अशासकीय सदस्य  विलास राठोड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रभाकर मुळे,माजी सरपंच विवेकानंद मिलगिरे, विक्रम देशमुख, ,महादेव सालगे अंगद जाधव, लक्ष्मण पाटील, कल्याण बिराजदार, सुजितसिंह  परिहार ,नंदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. महादेवी चिनगुंडे,  सोसायटीचे चेअरमन धर्मराव तुपे, सदस्य जयप्रकाश करंडे, मल्लिनाथ गुड्डे, विरु जमादार, माजी संरपच विश्वजित घंटे, ग्रा.प. सदस्य मल्लिनाथ कामशेट्टी,  सतीश काटे, मोहन मोरे, संतोष कांबळे, शशिकांत नागिले, धनराज कलशेट्टी, इरण्णा वाले, चनप्पा जेवळे, माजी सरपंच श्रध्दानंद कलशेट्टी आदीसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  शुभेच्छा देवुन अभिनंदन केले आहे .
 
 
Top