वृक्षारोपणा बरोबरच स्वताचे मुल समजुन प्रत्येकानी वृक्ष संगोपन करणे गरजेचे - डॉ. सिद्रामप्पा खजुरे

तुळजापूर तालुक्यातील गुजनूर येथे ३ हजार वृक्षारोपण

नळदुर्ग,दि.२० :

 स्वताचे मुल समजुन प्रत्येकानी वृक्ष संगोपन करणे गरजेचे आहे.वृक्षारोपण आभियान ही सतत चालणारी प्रक्रिया असून पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे मत जेष्ट सामाजसेवक डॉ.सिद्रामप्पा खजुरे यानी गुजनूर ता.तुळाजापूर येथे बोलताना व्यक्त 
केले.
 धाराशीव जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या हरित धाराशिव आभियानाच्या वतीने गुजनूर ता.तुळजापूर येथे शासकीय गावठाण जमिनीवर वृक्ष लागवडीच्या  आयोजित  कार्यक्रमात तीन हजार वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी डॉ. सिद्रामप्पा खजुरे हे उदघाटन प्रसंगी बोलत होते. 

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजनूरचे  सरपंच फूलचंद वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून शहापूरचे सरपंच उमेश गोरे, उपसरपंच नानासाहेब पाटील,   उपसरपंच,व्यकट साळूंके,तंटा मुक्त अध्यक्ष साहेबराव साळूंके, शहपूर तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते भास्कर सुरवसे, डॉ.यशवंत नरवडे, उपकृषी अधिकार डी.पी. बिराजदा,आदी उपस्थित होते.
   
या उपक्रमामध्ये जिल्हा प्रशासनातील महसुल,कृषी, बांधकाम, शैक्षणिकसह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी गुजनूर,शहापूर, गुळहळ्ळी आदी गावातील अशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, उमेदच्या सिआरपी,महिला,युवा कार्यकर्ते, शहापूर, गुजनूर येथिल जि.प. प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाज विद्यालय शहापूर आदी गावातील शालेय विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक,ग्रामस्थानी सहभाग नोंदविला.
 
 प्रारंभी  सरस्वतीच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी येथील शासकीय गायरान जमिनीवर विविध प्रकारची तिन हजार  वृक्षारोपण करण्यात  आले .
  यावेळी ग्राम महसुल अधिकारीआर.बी.पाटील , मंडळ कृषी अधिकारी सत्यजीत देशमुख, सहाय्यक कृषी अधिकारी यू. टी. करले , बांधकाम शाखा आभियंता जी.टी.घाटे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कुंभार, जी.आर.जमादार,पोखरा अभियानाचे स्वयंसेवक जितेंद्र माने,श्रीमंत सुरवसे, पत्रकार एस.के.गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नागमोडे,कमाबाई वाघमारे, प्रगती नागमोडे, नामदेव मोरे, सुवर्णा साळुंके,जगदेवी बिराजदार, बचतगटाच्या अश्विनी वाघमारे,अशा कार्यकर्ती प्रतिभा वाघमारे, अंगणवाडी कार्यकर्ती काजल मोरे,युवक कार्यकर्ते श्रीकांत स्वामी, विक्रम मुलगे, अनिल साळुंके, शेषेराव साळुंके,
हरीष सुरवसे,आरविंद जगताप,  जयभीम वाघमारे, मोहन व्हंताळे,किशोर वाघमारेसह ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी सर्वांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कुंभार यांनी मानले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top