इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा असलेल्या भुईकोट किल्ल्यावर १५० फुटांचा भगवा ध्वज उभारणार ; किल्ला सुशोभिकरणासाठी आराखडा तयार -पालकमंत्री प्रताप सरनाईक
नळदुर्ग दि. २१ :
नळदुर्ग येथे इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा असलेला भुईकोट किल्ला अत्यंत प्रेक्षणीय आहे.किल्ल्याच्या प्रथमदर्शनी १५० फुटाचा भगवा ध्वज उभा करण्यात येणार आहे . किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व किल्ला सुशोभिकरण करण्याकरिता आराखडा तयार केल्याची माहिती परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हायाचे पालकमंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी नळदुर्ग येथे सांगितले.
नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यास रविवार दि.२० जुलै रोजी दुपारी ११:३० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देवुन किल्ल्याची पाहणी केली.
ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी त्यांच सत्कार केला. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके व इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचा पारंपारीक घोंगडी, काठी आणि ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिमा देऊन पालकमंत्री सरनाईक यांचा सत्कार केला.
हा किल्ला संगोपन व जतनसाठी युनिटी कंपनीला शासनाने दिला होता. त्याची मुदत संपुन वर्ष होत आले. वर्षभरात किल्ल्याची दुरावस्था होत असल्याने शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी हा किल्ला पुन्हा शासनाने जतन व संगोपणासाठी देण्याबाबतचे निवेदन पालकमंत्री यांना दिले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख भगवान देवकते, जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, तुळजापूरचे तहसिलदार अरविंद बोळंगे, नळदुर्ग अपर तहसिलदार प्रमोद गायकवाड, नायब तहसिलदार भोकरे, पत्रकार विलास येडगे,महसुल अधिकारी विश्वास वायचाळ, संध्या कुलकर्णी, अकांक्षा वाघमारे, मुख्याधिकारी लक्ष्मण् कुंभार, महसुल सेवक सर्जे दत्तात्रय, शिवसेना शहरप्रमुख शिवाजी सुरवसे, उपशहरप्रमुख अफझल कुरेशी, दिपक घोडके, विधानसभा शहर संघटक गौस कुरेशी, उपशहर संघटक खय्युम सुंभेकर, मनोज मिश्रा, बंडु कसेकर, मुख्तार शेख, असलम शेख, अनिल भोपळे, अमोल जाधव , युनिटी कंपनीचे रईस जहागिरदार, तन्वीर निगेहबान आदि उपस्थित होते.