धर्मवीर संभाजी तरूण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी गणेश मोरडे, उपाध्यक्षपदी सन्नी भूमकर, तेजस जाधव यांची निवड
नळदुर्ग,दि.२१ :
धर्मवीर संभाजी तरूण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी गणेश मोरडे, उपाध्यक्षपदी सन्नी भूमकर, तेजस जाधव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नळदुर्ग शहरातील धर्मवीर संभाजी तरूण गणेश मंडळाची यावर्षीची नूतन कार्यकारणी निवडीची बैठक मंडळाचे अध्यक्ष सतीश पिंटू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चावडी भवनात रविवारी होवुन नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
अध्यक्ष गणेश मोरडे ,उपाध्यक्ष सन्नी भूमकर , तेजस जाधव ,कोषाध्यक्ष रोहन स्वामी ,सचिव रोहित वाले ,आकाश सुरवसे,सहसचिव संकेत स्वामी,प्रसिद्धी प्रमूख सनी सुरवसे ,सांस्कृतीक प्रमूख विनायक अहंकारी,मिरवणूक प्रमूख: रमेश जाधव, सतीश जाधव, संजय जाधव, राजेंद्र महाबोले, सुहास पुराणीक मुन्ना वाले, लेझीम प्रमूख श्रेयश स्वामी संकेत स्वामी आदीची निवड करण्यात आली आहे. तर यावर्षी मंडळास तात्याराव जाधव यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणवेश दिले आहेत.
यावेळी मंडळाचे सल्लागार महालिंग स्वामी, संजय जाधव, संजय स्वामी, राजेंद्र महाबोले, मावळते अध्यक्ष दिनेश डोंगरे, सुनील गव्हाणे, उमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.