मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन 

नळदुर्ग,दि.२१ : 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नळदुर्ग मंडल व ग्रामीण मंडल यांच्या वतीने नळदूर्ग शहरात  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात इच्छुक युवकांनी रक्तदान  करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मंगळवार दि.२२ जुलै रोजी नळदुर्ग शहरातील लोकमान्य वाचनालय येथे  सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नळदुर्ग शहरा व ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन नळदुर्ग तालुका मंडल अध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण महिला मंडल अध्यक्षा सौ  रंजनाताई  राठोड यांनी केले आहे.
रक्तदान हेडगेवार रक्तपेढी सोलापूर हे संकलन करणार आहेत.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top